एक्स्प्लोर

Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 

Palus Kadegaon Sabha Constituency : सांगली पॅटर्नमुळे चर्चेत आलेले विश्वजीत कदम यंदा पलूस कडेगावमधून तिसऱ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. संग्रामसिंह देशमुखांनी त्यांच्यासमोर आव्हान उभं केलं आहे. 

सांगली : पलूस कडेगाव मतदारसंघात पारंपरिक विरोधी गट असलेल्या कदम -देशमुख गटात लढत होतेय. काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ. विश्वजित कदम आणि भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे. कदम-देशमुख गटातील हे दोन तरुण नेते प्रथमच विधानसभेच्या निवडणुकीत आमने-सामने येत आहेत. 

पतंगराव कदम यांच्या निधनानंतर  झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजित कदम प्रथमच आमदार बनले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पलूस कडेगावची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आणि या निवडणुकीत देखील काँग्रेसचे विश्वजित कदम विक्रमी मतांनी निवडून आले. यंदा मात्र हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले संग्रामसिह देशमुख हे महायुतीचे उमेदवार आहेत. यामुळे सुरूवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता रंगतदार होण्याची शक्यता आहे.  

विश्वजीत कदमांचं मोठं नेटवर्क 

पतंगराव कदमांच्या निधनानंतर विश्वजीत कदमांनी गटाची धुरा सांभाळून राजकारण केलं. भारती विद्यापीठ, सोनहिरा साखर कारखाना, सूत गिरणी तसेच विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी हजारो जणांना रोजगार दिला. त्यामुळे यंदाही ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी आशा कार्यकर्त्यांना आहे. 

या मतदारसंघात शेकडो कोटींची विकासकामे जिल्हा परिषद माध्यमातून मार्गे लावली आहेत. याच बरोबर टेंभू, ताकारी योजनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विस्तारीत कामांना गती दिली असल्याचा दावा संग्रामसिंह देशमुखांनी केला. कामाच्या जोरावर यंदा पलूसकर आपल्याला मतदान करतील असा विश्वासही त्यांना आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विश्वजीत कदमांनी सांगली पॅटर्न राबवून आपली ताकद दाखवून दिली. अपक्ष असलेल्या विशाल पाटलांच्या मागे सर्व ताकद लावून त्यांनी निवडून आणलं. त्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या वर्तुळात आणि जिल्ह्यात विश्वजीत कदमांची ताकद वाढल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता विजयाची हॅट्रिक करून विश्वजीत कदम आपला दबदबा कायम ठेवण्याच्या तयारीत आहेत. 

2019 सालचा निकाल काय? 

गेल्या निवडणुकीचा विचार करता काँग्रेसच्या डॉ. विश्वजीत कदमांना 1,71,497 इतकी मतं मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकाची मतं ही नोटाला मिळाली होती. ती 20, 651 इतकी होती. तर शिवसेनेचे संजय विभुते हे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना फक्त 8,976 मतं मिळाली होती. 

ही बातमी वाचा: 

                                               

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines at 10AM 28 January 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्सEknath Shinde Thane : 55 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंचं भाषण, ठाकरेंवर हल्लाबोलRaigad Marathi Family Issue : रायगडमध्ये मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून अपमानास्पद वागणूकDhananjay Deshmukh : वाल्मिक कराडला कोणता आजार झाला होता याची माहिती द्या : धनंजय देशमुख

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
Maharashtra Weather: उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
Embed widget