एक्स्प्लोर

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!

Shahu Maharaj : कागल आणि महाराष्ट्रात परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि महाराष्ट्र जनता परिवर्तन नक्की करेल ही शंका नसल्याचेही शाहू महाराज यावेळी म्हणाले. 

Shahu Maharaj : कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवारीवरून झालेल्या घडामोडीनंतर छत्रपती घराण्याने राजेश लाटकर यांच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यानंतर आता कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारासाठी सुद्धा आता सक्रियपणे सहभाग घेतला आहे. आज गडिंग्लजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची घाटगे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेसाठी खासदार शाहू महाराज सुद्धा उपस्थित राहिले. यावेळी बोलताना शाहू महाराज यांनी चांगली टोलेबाजी केली. कागल आणि महाराष्ट्रात परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि महाराष्ट्र जनता परिवर्तन नक्की करेल ही शंका नसल्याचेही शाहू महाराज यावेळी म्हणाले. 

मी पुरोगामी आहे असं काही जण म्हणत होते

शाहू महाराज म्हणाले की, समरजितसिंह घाटगे कोणतेही पद नसताना सातत्याने काम करत आहेत. त्यांनी अनेक मंजुरी आणल्या आहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक केले पाहिजे. शाहू महाराज पुढे म्हणाले की ते स्वतः सीए असल्याने त्यांना गणित चांगलं कळतं. आपल्याला महाराष्ट्र खंडणी मुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. मी पुरोगामी आहे असं काही जण म्हणत होते, मात्र फुले शाहू आंबेडकर यांचे विचार सोडून गेले, असा टोला शाहू महाराजांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, आपल्या लाडक्या बहिणींना आपण तीन हजार रुपये देणार आहेत. महाराष्ट्र एक नंबरवर आणायचा आहे, त्यासाठी समरजित घाटगे यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. कागलमध्ये लोकसभेला विरोधकाने म्हटलं होते की शाहू महाराजांवर दोन लाखांचे लीड असेल. मात्र, विरोधकांची सगळी गणिते बिघडली, असा टोलाही त्यांनी लगावला.

शरद पवारांची चंदगडकरांना साद

दरम्यान, चंदगडमध्येही शरद पवार यांची सभा पार पडली. शरद पवार म्हणाले की, संध्यादेवी यांची इच्छा नसताना आम्ही त्यांना आमदार केलं. आता बाबासाहेब त्यांच्याप्रमाणे वेगानं काम करणारे आणि इथल्या लोकांशी जुळवून घेणारे नेतृत्व नंदाताई यांच्याशिवाय दुसरे कुणी नाही आणि मला खात्री आहे आमची निवड 23 तारखेला योग्य ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंदगडमधील सभेत व्यक्त केला. फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर नंदाताई यांना निवडून द्या, नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे नंदाताईच्या पाठीशी उभा रहायचं, असे शरद पवार यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hinjewadi Accident News: हिंजवडीमध्ये डंपरच्या धडकेत बापलेकीची ताटातूट, लेकीचा मृत्यू, वडील जखमी, फरार डंपर चालकाला बेड्या, आयटी परिसरात वाहनांच्या अपघातांचे सत्र
हिंजवडीमध्ये डंपरच्या धडकेत बापलेकीची ताटातूट, लेकीचा मृत्यू, वडील जखमी, फरार डंपर चालकाला बेड्या, आयटी परिसरात वाहनांच्या अपघातांचे सत्र
Advay Hiray joins BJP: उद्धव ठाकरेंना जबर धक्का, अद्वय हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार, नाशिकमध्ये ठाकरे गटाची वाताहात
उद्धव ठाकरेंना जबर धक्का, अद्वय हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार, नाशिकमध्ये ठाकरे गटाची वाताहात
Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये आमदार पत्नी विरुद्ध आमदाराची भावजयी रिंगणात; सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला; बाळासाहेब थोरातांच्या भगिनीही मैदानात
संगमनेरमध्ये आमदार पत्नी विरुद्ध आमदाराची भावजयी रिंगणात; सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला; बाळासाहेब थोरातांच्या भगिनीही मैदानात
Maharashtra Weather Update : पुणेकर गारठले, तापमान 10 अंशांच्या खाली, पुढील तीन दिवसांत कहर होणार, हवामान खात्याचा इशारा
पुणेकर गारठले, तापमान 10 अंशांच्या खाली, पुढील तीन दिवसांत कहर होणार, हवामान खात्याचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP vs Shiv Sena :भाजपचा शिंदे सेनेला दे धक्का, दिवंगत वामन म्हात्रेंच्या मुलाचा, सुनेचा भाजप प्रवेश
Advay Hiray Join BJP Nashik : हिरेंचे हुर्रे! ठाकरे सेनेचे अद्वय हिरे भाजपत जाणार
Supreme Court on Maharashtra Electon :आरक्षित जागांची संख्या 50%पेक्षा जास्त झाल्यास निवडणुकाच रोखू
Morning Prime Time News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 18 Nov : ABP Majha
Mumbai CNG Crisis : मुंबई आणि परिसरात कालपासून सीएनजीचा तुटवडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hinjewadi Accident News: हिंजवडीमध्ये डंपरच्या धडकेत बापलेकीची ताटातूट, लेकीचा मृत्यू, वडील जखमी, फरार डंपर चालकाला बेड्या, आयटी परिसरात वाहनांच्या अपघातांचे सत्र
हिंजवडीमध्ये डंपरच्या धडकेत बापलेकीची ताटातूट, लेकीचा मृत्यू, वडील जखमी, फरार डंपर चालकाला बेड्या, आयटी परिसरात वाहनांच्या अपघातांचे सत्र
Advay Hiray joins BJP: उद्धव ठाकरेंना जबर धक्का, अद्वय हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार, नाशिकमध्ये ठाकरे गटाची वाताहात
उद्धव ठाकरेंना जबर धक्का, अद्वय हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार, नाशिकमध्ये ठाकरे गटाची वाताहात
Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये आमदार पत्नी विरुद्ध आमदाराची भावजयी रिंगणात; सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला; बाळासाहेब थोरातांच्या भगिनीही मैदानात
संगमनेरमध्ये आमदार पत्नी विरुद्ध आमदाराची भावजयी रिंगणात; सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला; बाळासाहेब थोरातांच्या भगिनीही मैदानात
Maharashtra Weather Update : पुणेकर गारठले, तापमान 10 अंशांच्या खाली, पुढील तीन दिवसांत कहर होणार, हवामान खात्याचा इशारा
पुणेकर गारठले, तापमान 10 अंशांच्या खाली, पुढील तीन दिवसांत कहर होणार, हवामान खात्याचा इशारा
Kalyan Dombivli Mahanagarpalika: कल्याण-डोंबिवलीत भाजपने अखेर  घाव घातलाच, सुगावा लागून न देता श्रीकांत शिंदेंच्या मर्जीतील नगरसेवक फोडले
कल्याण-डोंबिवलीत भाजपचं ऑपरेशन लोटस, सुगावा लागून न देता श्रीकांत शिंदेंच्या मर्जीतील नगरसेवक फोडले
Maharashtra Politics: देख रहा है बिनोद…! निवडणुकीत सगेसोयरे अन् नातेवाईकांनाच उमेदवारी; कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?
देख रहा है बिनोद…! निवडणुकीत सगेसोयरे अन् नातेवाईकांनाच उमेदवारी; कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?
Aishwarya Sharma Cryptic Post On Divorce Rumors: घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगला वैतागली ऐश्वर्या; क्रिप्टिक पोस्टमधून ठणकावून सांगत म्हणाली...
घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगला वैतागली ऐश्वर्या; क्रिप्टिक पोस्टमधून ठणकावून सांगत म्हणाली...
Loan Interest waiver scheme: नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारने हुकमी अस्त्रं बाहेर काढलं, घसघशीत फायद्याची योजना केली सुरु, कोणाला फायदा?
निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारने हुकमी अस्त्रं बाहेर काढलं, घसघशीत फायद्याची योजना केली सुरु, कोणाला फायदा?
Embed widget