Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता’ची मालिकेत एन्ट्री होणार! शैलेश लोढा नाही तर ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका!
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडल्यापासून आता या भूमिकेत नेमकी कुणाची वर्णी लागणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावर्षी लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) नुकतीच 14 वर्ष पूर्ण केली. सध्या ही मालिका काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. गेल्या 14 वर्षांच्या प्रवासात या मालिकेत अनेक नवीन कलाकार आले, तर काहींनी या मालिकेला रामराम ठोकला. याच मालिकेत गेली 14 वर्ष ‘तारक मेहता’ साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी हा शो काही दिवसांपूर्वीच सोडला होता. मात्र, आता मालिकेत ‘तारक मेहता’चं पुनरागमन होणार आहे.
अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडल्यापासून आता या भूमिकेत नेमकी कुणाची वर्णी लागणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. शैलेश लोढा यांनी शूटिंग बंद केल्याने मालिकेचा ट्रॅक देखील बदलण्यात आला होता. नव्या ट्रॅकनुसार तारक मेहता नवीन ऑफिसच्या सेटअप निमित्ताने बाहेरगावी गेले असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, प्रेक्षक या पात्राला खूपच मिस करत होते. अखेर या पात्राची पुन्हा एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. निर्मात्यांना या भूमिकेसाठी नवा चेहरा मिळाला आहे.
‘हा’ अभिनेता साकारणार ‘तारक मेहता’!
मालिकेचे निर्माते गेल्या काही दिवसांपासून या पात्रासाठी नवीन अभिनेत्याच्या शोधात होते. गेली 14 वर्ष तारक मेहता म्हणून झळकलेल्या शैलेश लोढा यांची रिप्लेसमेंट शोधणं तसं कठीणच होतं. मात्र, आता त्यांना नवीन अभिनेता मिळाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये तारक मेहताच्या भूमिकेत अभिनेते जयनीरज राजपुरोहित (Jaineeraj Rajpurohit) दिसणार आहेत. अभिनेते जयनीरज राजपुरोहित ‘बालिका वधू’ या मालिकेत झळकले होते. याशिवाय ते 'ओह माय गॉड', 'आउटसोर्स' आणि 'सलाम वेंकी'सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसले आहेत. तथापि, अद्याप शोचे निर्माते किंवा जयनीरज राजपुरोहित यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
अभिनेते शैलेश लोढा यांनी हा शो सोडण्याचे कारण म्हणजे त्यांना आता नवीन संधींवर काम करायचे होते. या शोमुळे त्यांना इतर प्रोजेक्टमध्ये काम करता आले नाही, त्यामुळेच त्यांनी हा शो सोडण्याचा विचार केला. शैलेश यांच्या आधी दिशा वकानी, नेहा मेहता आणि गुरचरण सिंह यांनीही शो हा सोडला आहे.
शो मस्ट गो ऑन!
काहीच दिवसांपूर्वी शैलेश लोढा यांच्या एक्झिटवर प्रतिक्रिया देताना निर्माते असित मोदी म्हणाले की, त्यांच्या परत न येण्यामुळे हा शो थांबणार नाही. नवीन तारक मेहता प्रेक्षकांच्या भेटीला नक्कीच येतील. जुने तारक मेहता परत आले तर आनंद होईल, मात्र नवीन तारक मेहता आले तरी तितकाच आनंद वाटेल. आता प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवणं, हेच माझं ध्येय आहे.
हेही वाचा :