Degree College Admission: विद्यार्थ्यांनो निकाल लागला, आता पुढील प्रक्रिया काय? प्रवेशासाठी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार
College Admission: बारावीचा निकाल जाहीर असून पुढील प्रवेशप्रक्रियेसाठी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची आवश्यकता आहे.
Degree College Admission: बारावीच्या परीक्षेत (12 th Exam) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आता पुढील शिक्षणासाठी प्रवेशप्रक्रिया (Admission Process) पूर्ण करण्याची लगबग सध्या सुरु आहे. त्यानुसार महाविद्यालय (Colleges) आणि संबंधित विद्यापिठाकडून (University) प्रवेशाची प्रक्रिया सुरु देखील करण्यात आली आहे. परंतु प्रवेशप्रक्रिया पूर्ण करताना अनेक विद्यार्थी संभ्रमात येतात. कधीकधी महत्त्वाची कागदपत्र राहून जातात, तर कधी काही महत्त्वाची माहिती भरणं राहून जातं. पण अशावेळी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे घाबरुन न जाता किंवा संभ्रम निर्माण न करता प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी काही महत्त्वाची कागदपत्र तयार ठेवली तर विद्यार्थ्यांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.
वैद्यकीय (Medical) किंवा अभियांत्रिकी (Engineering) अभ्यासक्रमासाठी आवश्यक कागदपत्र
* नीट ऑनलाइन फॉर्म प्रिंट
* नीट प्रवेश पत्र व नीट मार्कशिट
* मार्क शीट 10 वी, दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, मार्क शीट 12वी
* नॅशनॅलिटी सर्टिफिकेट
* रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, उतपन्न प्रमाणपत्र किंवा वडिलांच्या उत्पन्नाचा दाखल फॉर्म क्र. 16
* 12वी ची टीसी
* मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट
* विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते
* विद्यार्थी तसेच आई-वडिलांचे दोघांचे पॅनकार्ड
इतर अभ्यासक्रमासाठी (Other Courses) ही कागदपत्र आवश्यक
* जात प्रमाणपत्र
* जात वैधता प्रमाणपत्र
* नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र
* डोमिसाइल प्रमाणपत्र
* दिव्यांगता प्रमाणपत्र
* आधार क्रमांक
* राष्ट्रीयकृत बँक खाते
* सैन्यदल वर्गाचे प्रमाणपत्र (या कोट्यातून प्रवेश घ्यायचे असल्यास)
* अल्पसंख्याक वर्गाचे प्रमाणपत्र (या कोट्यातून प्रवेश घ्यायचे असल्यास)
मागासवर्गीयांसाठी ही कागदत्र आवश्यक
1. जात प्रमापत्र (Caste Certificate)
2. जातवैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
3. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Criminal Certificate)
विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यसाठी अनेक अर्ज भरावे लागतात. हे अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी गोंधळून जाणे टाळावे. अन्यथा अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून काही चूका होऊ शकतात. परंतु त्या चुका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक ती काळजी घेतल्यास चुका होणार नाहीत.
अर्ज भरताना कोणती काळजी घ्याल?
अर्ज भरताना तुमची गुणपत्रिका, जातीचा दाखला, आधार कार्ड यांसारख्या आवश्यक कागदपत्रांची कॉपी कायम सोबत ठेवा, जेणेकरुन अर्ज भरताना माहिती भरण्यास सोपे जाईल. तसेच तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो देखील तयार ठेवावे. जर तुम्ही ऑफलाइन अर्ज भरत असाल तर तुमच्या अर्जासोबत कागपत्र जोडण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी म्हणजेच स्टॅपलर, गम यांसारख्या गोष्टी देखील सोबत ठेवा. तसेच अर्जात दिलेल्या प्रमाणेच प्राथमिक माहिती जसे की, विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, नागरिकत्व, जन्मतारिख यांसारखी महत्त्वाची माहिती अचूक भरावी.
अर्जामध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्या शाईचे पेन वापरावे, कोणत्या भाषेत अर्ज भरावा या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि त्यानंतर योग्य पद्धतीने अर्ज भरावा. अर्ज भरताना काही चूका होऊ नये म्हणून तुम्ही आधी अर्जाची झेरॉक्स कॉपी काढून तो भरु शकता आणि त्यानंतर मूळ अर्ज भरा. त्यामुळे मूळ अर्जात चूका न होण्यास मदत होईल. तसेच अर्ज भरताना काही शंका असल्यास त्यासंर्दभात योग्य मार्गदर्शन घेऊन शंकेचे निरसन करावे. ऐनवेळेस अर्ज भरणे टाळा, त्यासाठी अर्ज भरण्याच्या तारखा आणि वेळापत्रक यांवर लक्ष ठेवा. ऑनलाइन अर्ज भरण्याच्या वेळेस आवश्यक ती कागदपत्र स्कॅन करुन ठेवा आणि ती तुमची कागपत्रे एका फोल्डरमध्ये अथवा पेनड्राईव्हमध्ये सेव करा.
अर्ज भरताना गोंधळून न जाता किंवा कोणताही संभ्रम निर्माण न करता या सर्व गोष्टींचे पालन केल्यास अर्ज भरताना कोणतीही अडचण निर्माण न होण्यास विद्यार्थ्यांना मदत होईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
HSC Exam: इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचे आवेदन पत्र भरण्यास सुरवात; 'या' ठिकाणी करावा लागणार अर्ज
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI