Chitra Wagh : तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते; चित्रा वाघ यांचं त्या वक्तव्यावर स्पष्टपणे केलं भाष्य, म्हणाल्या, 'त्यांच्या डोक्यातचं विकृती भरली...'
Chitra Wagh : तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं का, इथे काय वशिल्याने आले नाही.. अशा शब्दात चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला होता, वाघ यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

पुणे: काही दिवसांपूर्वी विधान परिषदेमध्ये अधिवेशनावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या प्रश्नांना भाजप आमदार आमदार चित्रा वाघ यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं. अनिल परब तुम्ही मोठे वकील असाल, तुम्ही मोठे पोपटपंडित असाल… पण मी तुम्हाला घाबरत नाही. माझ्या परिवाराने सहन केलं ते बघायला तुम्ही आला नव्हता. पाय खेचायला 100 लोक असतात. तुमच्यासारखेही असतात. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं का, इथे काय वशिल्याने आले नाही.. अशा शब्दात चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला होता, वाघ यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यानंतर आता त्यांनी त्यांच्या त्या वक्तव्यावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ?
मी गप्प बसणाऱ्यातील नाही आणि म्हणून ते वाक्य वापरलं. तुझ्यासारखे 56 तंगड्याला बांधून फिरते. मग लगेच आकडा कमी झाला. हा आकडा मोठा हवा होता. कोणं म्हणतं? महिला, कारण या महिलांच्या डोक्यात म्हणजे मला सगळ्यांना सांगायचंय प्रत्येक वेळेला कुठल्याही बाईबरोबर पुरूषाची जोडी लावणं गरजेचं आहे का? हे क्षेत्र पुरूषांचं आहे. महिलांचं नाहीये, इथे नेता हे सगळे पुरूष आहेत. त्यांच्याकडे सतत जावं लागतं महिलांना, त्यांच्याकडून सतत काम करून घ्यावी लागतात आणि म्हणून त्या महिला त्यांना भेटत असतात. मग मी असा शब्दप्रयोग वापरल्यानंतर त्यांच्या डोक्यातचं विकृती भरली आहे. त्यांनी लगेच आकडा मोठा झाला का? की कमी झाला? असं काहीतरी विचित्र शब्द वापरले, त्या वाक्याचा अर्थ, अगदी की हा एकटा माणूस नाहीये. याच्यासारखे 56 बाहेर आहेत. विकृत माणसिकतेचे आणि ती विकृत मानसिकता आम्ही पायाला बांधून फिरतो. मी या सर्व विकृतांचे आभार सुध्दा मानते. रोज. तुम ना होते तो, हम ना एसे बनते, तुम्ही जर अशा शिव्या दिल्या नसत्या, तुम्ही जर सतत आमच्यावर टीका केली नसती. तुम्ही आमच्यावरती फार विकृत मानसिकतेतून बोलला नसता तर, कदाचित आज आम्ही खंबीर झालो नसतो, असंही पुढे आमदार चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
सभागृहात नेमकं काय घडलं?
दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका करत दिशाच्या मृत्यूची चौकशी पुन्हा करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी दिशाच्या मृत्यूप्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचाही संबंध आहे, असा आरोप केला आहे. त्यानंतर हाच मुद्दा विधिमंडळाच्या सभागृहात उपस्थित झाला. आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. तर विरोधी बाकावर बसलेल्या ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आदित्य ठाकरे यांचा बचाव करताना शिंदे गटाचे आमदार तथा मंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले. हे सर्व सांगताना त्यांनी भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांच्यावरही टीका केली. त्यानंतर अनिल परब यांच्या टीकेला चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात उत्तर दिले.
चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना उद्देशून भाषण केले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी करा ही मागणी करताना माझी भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडली. मात्र संजय राठोड यांना क्लिनचीट कोणी आणि का दिली? हे अनिल परब यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारावं असं आव्हान दिलं. तसेच परब यांना उद्देशून चित्रा वाघ तुमच्यासारखे 56 अनिल परब पायाला बांधून फिरते, असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती, आज त्यांनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत यावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे.























