एक्स्प्लोर

Saurabh Meerut Murder Case: नवऱ्याचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरणारी मारेकरी मुस्कान जेलमध्ये हे काम करणार; तर तिचा प्रियकर साहिल पिकवणार भाजीपाला

Saurabh Meerut Murder Case: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी साहिल आणि मुस्कान यांना शनिवारी मुळाहिजा बॅरेकमधून जनरल बॅरेकमध्ये हलवण्यात आले. साहिलचे नवीन स्थान बॅरॅक 18A आणि मुस्कानचे 12B असणार आहे.

Saurabh Meerut Murder Case: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी साहिल आणि मुस्कान यांना काल(शनिवारी) मुलाहिजा बॅरेकमधून जनरल बॅरेकमध्ये हलवण्यात आले. साहिलचे नवीन स्थान बॅरॅक 18A आणि मुस्कानचे 12B असणार आहे. ब्रह्मपुरी येथील इंदिरानगर येथील मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिलसोबत पती सौरभचा खून केला होता. पोलिसांनी दोघांनाही अटक करून 19 मार्च रोजी न्यायालयात हजर केले, तेथून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

पहिले दहा दिवस कैद्यांना कारागृहाच्या मुळाहिजा बॅरेकमध्ये ठेवण्याची व्यवस्था आहे. साहिल आणि मुस्कान यांनाही मुळाहिजा बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते. मुस्कान 12 क्रमांकाच्या बॅरेकमध्ये तर साहिल 18 क्रमांकाच्या बॅरेकमध्ये राहिला. शनिवारी दहा दिवस पूर्ण झाले. यानंतर तुरुंग प्रशासनाने साहिल आणि मुस्कान यांना इतर कैद्यांसह मुख्य बॅरेकमध्ये हलवले. साहिल आता बॅरेक क्रमांक 18A मध्ये राहणार आहे तर मुस्कानला बॅरेक क्रमांक 12B देण्यात आला आहे. मुस्कानने तुरुंगात शिवणकाम शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे, आता मुस्कानला शिवणकाम आणि भरतकामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर साहिल शुक्ला यानी शेती शिकण्याची इच्छा व्यक्त केली. आता साहिल तुरुंगात भाजीपाला पिकवणार आहे.

मुस्कान शिलाईकाम करणार तर साहिल शेतीत राबणार

तुरुंगात असलेले मुस्कान आणि साहिल अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर येत आहेत. त्याची दिनचर्याही सुधारली आहे. दोघेही वर्तमानपत्र वाचतात आणि उर्वरित वेळ टीव्ही पाहतात. आता त्यांनी तुरुंग प्रशासनाला विनंती केली आहे. मुस्कानने टेलरिंग शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर साहिलने शेतीत काम करण्याची विनंती केली आहे. वरिष्ठ तुरुंग अधीक्षक डॉ. वीरेश राज शर्मा यांनी सांगितले की, मुस्कान-साहिल मुळाहिजा बॅरेकमधून बाहेर आले आहेत. दोघांनाही मुख्य बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे. त्याची दिनचर्या सुधारली आहे. मुस्कानला शिवणकाम करायचे आहे, तर साहिलला शेती करायची आहे.

साहिल-मुस्कानची केस रेखा जैन कोर्टात लढणार 

साहिल आणि मुस्कानची केस रेखा जैन लढणार आहेत. रेखा जैन यांची जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने नियुक्ती केली होती. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मेरठचे सचिव उदयवीर सिंग म्हणाले की, प्रत्येकाला न्याय मिळवून देणे ही कायदेशीर प्राधिकरणाची जबाबदारी आहे. कलम 12 अन्वये सौरभ हत्याकांडातील आरोपी साहिल आणि मुस्कान यांना मोफत कायदेशीर मदतही देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की रेखा जैन मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण वकील आहेत. रेखा जैन यांच्यासोबत उपमुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक नासिर अहमद आणि सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक अंबर सहारन, सहायक कायदेशीर सहायक संरक्षण समुपदेशक चंद्रिका कौशिक देखील रेखा जैन यांना मदत करतील.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने पती सौरभ राजपूतची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि ते एका ड्रममध्ये भरून वरून काँक्रिट सिमेंट ओतलं. एवढंच नाही तर यानंतर मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला हे दोघे त्यानंतर हिमाचल प्रदेशला फिरायला गेले. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला बेड्या ठोकल्या आहेत. सौरभ राजपूतच्या हत्येच्या आधी मुस्कान रस्तोगी तिच्या बेशुद्ध पती सौरभ राजपूतच्या छातीवर बसली होती, तेव्हा तिचा प्रियकर साहिल शुक्लाने तिला चाकू दिला आणि सौरभच्या छातीत तीन वेळा वार करण्यासं सांगितलं होतं. राजपूतच्या छातीत तीन वेळा वार करण्यात आले होते, अशी माहिती आता शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. सौरभ राजपूतची मान कापलेली, त्याचे पाय कापलेले आणि धड तुटलेले होते, अशी माहिती शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या डॉक्टरांनी सांगितलं. 

मुस्कान रस्तोगी 27 वर्षांची असून 2016 साली तिने सौरभ राजपूतशी लग्न केले होते. या लग्नाला दोन्ही कुटुंबाचा विरोध होता. सौरभने मुस्कानसाठी त्याच्या कुटुंबियांना सोडले. दोघेही मेरठमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. मुस्कानने 2019 साली एका मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म दिल्यानंतर मुस्कान आणि तिचा बालपणीचा मित्र साहिल शुक्ला पुन्हा एकदा भेटले आणि त्यांच्यात संबंध सुरू झाले. मुस्कान आणि साहिल इयत्ता आठवीपर्यंत एकाच वर्गात होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Gadchiroli : काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढतीची शक्यता, नागरिकांच्या अपेक्षा काय?
Pankaja Munde Speech Beed : परळीची जनता इतिहास घडवणार;पंकजा मुंडेंचं बीडमध्ये तुफान भाषण
Mahapalikecha Mahasangram Uran : उर भागात लोकसंख्या वाढ मात्र सुविधा अपुऱ्या, काय म्हणाले नागरिक?
Dhananjay Munde and Walmik Karad: भाषण सुरु असताना धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण?
Raosaheb Danve & Babanrao Lonikar : 40 वर्ष एकाच पक्षात, पण 12 वर्षे अबोला,  दानवे-लोणीकर एकत्र

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
Embed widget