एक्स्प्लोर

MHT CET Result 2023: एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल 12 जूनला; कॅप प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यात

MHT CET 2023: बारावी बोर्ड परीक्षेनंतर शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल 12 जून रोजी जाहीर होणार आहे.

MHT CET 2023: बारावी बोर्ड परीक्षेनंतर शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी (MHT CET 2023) परीक्षेचा निकाल 12 जून रोजी लागणार आहे. निकाल जरी 12 जून रोजी लागणार असली तरी त्याआधी जूनच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यात सीईटी सेलकडून सुरु करण्यात येईल.

सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच कॅप राऊंड सुरु होतील, असं सीईटी सेलकडून सांगण्यात आलं आहे. आगामी शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु व्हावं, त्या दृष्टिकोनातून सीईटी सेलकडून नियोजन केलं जात आहे. यासाठी लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत.

एमएचटी सीईटी परीक्षा दोन सत्रांत

राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी सीईटी 9 ते 21 मे या कालावधीत घेण्यात आली. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची (पीसीएम) परीक्षा 9 मे ते 13 मे दरम्यान घेण्यात आली होती. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची (पीसीबी) परीक्षा 15 मे ते 20 मे या कालावधीत पार पडली होती. पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत झाली होती.

निकालाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष

राज्य मंडळाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक आणि बिगरव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेध लागले आहेत.  यंदा 6 लाख 36 हजार 89 विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. अभियांत्रिकी (Engineering), औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy), कृषी अभ्यासक्रमांच्या (Agriculture) प्रवेशासाठी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष सीईटीच्या निकालाकडे लागले आहे. 

MHT CET 2023: परीक्षा कशासाठी घेतली जाते?

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलमार्फत ही परीक्षा घेतली जाते.अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, फार्मसी, महाराष्ट्र राज्य सेल लॉ आणि कृषी शिक्षणातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा आयोजित केली जाते. एमएचटी सीईटी कट-ऑफ हे संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्याने मिळवलेले किमान गुण असतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक असतं. विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमातील उत्तरं द्यावी लागतात.

हेही वाचा:

Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात, कुठे आणि कसा पाहाल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget