ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 07 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स New
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 07 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स New
संतोष देशमुखांचा शवविच्छेदन अहवाल माझाच्या हाती, शरीराच्या प्रत्येक भागावर गंभीर जखमा, संपूर्ण शरीर काळंनिळं...बेदम मारहाणीचं धक्कादायक वास्तव अहवालात नमूद
आमदार धसांचा मारकुटा कार्यकर्ता सतीश भोसलेचे अनेक कारनामे उघड, मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल होऊनही अजून अटक का नाही? सवाल उपस्थित
महाराष्ट्रात ९ महिन्यांत दहा वर्षांतली विक्रमी परकीय गुंतवणूक, मुख्यमंत्र्यांची माहिती, ९ महिन्यांत १ लाख ३९ हजार ४३४ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक
एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय अजय अशर यांना मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरुन हटवलं, फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का, तीन उपाध्यक्षांची केली नियुक्ती..
अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केलं राष्ट्रवादीत स्वागत..
आज सादर होणार राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल,लाडकी बहिण योजना आणि इतर योजनांसाठी केलेल्या खर्चानंतर राज्याची आर्थिक स्थिती कशी याची उत्सुकता























