16 वर्षीय मुलीवर वृद्ध चक्कीवाल्याकडून दीड वर्ष अत्याचार; जन्मदात्या आईचा कृत्याला पाठिंबा? मुंबईतील धक्कादायक प्रकार
Mumbai Crime News: आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. 16 वर्षीय मुलीवर वृद्ध चक्कीवाल्याचा दीड वर्ष अत्याचार.

Mumbai Crime News: आई आपल्या पोटच्या गोळ्याला जीवापाड जपते. एका मुलीची ती आई असतेच, पण ती मैत्रिणही असतेच. पण मुंबईतील (Mumbai News) एका आईनं आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे. पैशाच्या हव्यासापोटी एका आईनं आपल्या पोटच्या 16 वर्षीय मुलीला एका वृद्ध चक्कीवाल्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं. गेल्या दीड वर्षांपासून वृद्ध चक्कीवाला अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. अखेर अन्याय सहन न झाल्यानं मुलीनं या विरोधात आवाज उठवला आणि पोलिसांत धाव घेतली.
आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईतील (Crime News) अंधेरी पश्चिम (Andheri West) भागात घडली आहे. पैशाच्या हव्यासापोटी सख्या आईनंच पोटच्या 16 वर्षीय मुलीला तिच्या तिप्पट वयाच्या वृद्ध चक्कीवाल्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडलं. मागील दीड वर्षापासून चक्कीवाल्याकडून सुरू असलेल्या या अत्याचाराबाबत मुलीनंच आवाज उठवला. मुलीनं पोलिसांत धाव घेत सर्व प्रकारासंदर्भात डी. एन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. डी.एन नगर पोलिसांनी पीडित मुलीची आई आणि साठ वर्षीय चक्कीवाल्याला ताब्यात घेतलं असून दोघांवरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीसार, मुंबईतील अंधेरी पश्चिमेला पीडित मुलगी आपल्या आईसोबत राहत होती. वडिलांचं आकस्मिक निधन झाल्यानंतर कुटुंबाचा डोलारा तिच्या आईनं आपल्या खांद्यावर घेतला. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अधिक पैसे मिळावेत त्यामुळे आईनं मुलीलाही कामावर पाठवण्याचा निर्णय घेतला. आरोपी आईनं आपल्या मुलीला परिसरातील फ्लोअर मिलमध्ये कामाला पाठवण्यास सुरुवात केली. मुलीनं कामावर जाण्यास सुरुवात केली. मात्र, तिथे कामाऐवजी चक्कीवाल्याकडून मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात झाली. ही बाब पीडित मुलीनं आपल्या आईला सांगितली.
आईनं मात्र मुलीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. आईनं मुलीला तुझं हेच काम आहे आणि तुला ते करावंच लागेल असं उत्तर दिलं. तसेच, मुलीनं नकार दिल्यानंतरही तिच्यावर दबाव आणून वृद्ध इसमासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास तिला सांगितलं. गेल्या दीड वर्षांपासून म्हणजेच, नोव्हेंबरपासून मुलीवर अत्याचार सुरू होते. अखेर अन्याय असह्य झाल्यामुळे पीडितेनं पोलिसांत धाव घेतली. पीडितेनं याप्रकरणी मुलीचा जबाब नोंदवून डी.एन नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आरोपी चक्कीवाला आणि पीडितेच्या आईला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक तपास डी. एन नगर पोलीस करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbai Crime : अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी, चार लाखांच्या घड्याळावर डल्ला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
