Mumbai Crime : अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी, चार लाखांच्या घड्याळावर डल्ला
Robbery At Kranti Redkar's House : अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी झाल्याचं नुकतंच उघडकीस आलं आहे. चार लाख रुपये किमतीचे मनगटी घड्याळ चोरी झाल्याची तक्रार तिने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.
Robbery At Kranti Redkar's House : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिच्या घरी चोरी झाल्याचं नुकतंच उघडकीस आलं आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणीने ही चोरी केल्याचा आरोप क्रांती रेडकरने केला आहे. घरातील मौल्यवान असं साडेचार लाख रुपये किमतीचे मनगटी घड्याळ (Wrist Watch) चोरी झाल्याची तक्रार क्रांतीने मुंबईतील (Mumbai) गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon Police Station) दिली आहे. त्यांनतर गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून यासंदर्भात पुढील तपास सुरु केला आहेत.
घरात कोणीही नसताना चोरी, मोलकरीण पसार
क्रांती रेडकरच्या घरात काम करणाऱ्या महिलेची नेमणूक एका एजन्सीमार्फत करण्यात आली होती. मात्र काही दिवस काम केल्यानंतर घरात कोणी नसताना चोरीची घटना घडली. चोरी झाल्यानंतर संबंधित मोलकरीण पसार झाली. त्यामुळे तिनेच चोरी केल्याचा आरोप क्रांती रेडकरचा आहे. याबाबत तिच्या तक्रारीवरुन गोरेगाव पोलीस त्या महिलेला नोकरीवर ठेवलेल्या एजन्सीचा आणि महिलेचा देखील तपास करत आहेत.
मोलकरणीच्या अटकेसाठी पोलीस उत्तर प्रदेशला रवाना
क्रांती रेडकरच्या घरातून घड्याळाची चोरी ही फार दिवसांपूर्वी झाली होती. परंतु ही बाब नुकतीच लक्षात आली. त्यानंतर क्रांतीने 5 जानेवारी रोजी गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान आरोपी मोलकरणीने उत्तर प्रदेशला पळ काढला आहे. पोलिसाचं पथक देखील तिला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेशला रवाना झालं आहे. लवकरच तिला अटक करुन मुंबईत आणलं जाईल.
क्रांतीचं दिग्दर्शनात पाऊल
क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. क्रांतीने आता दिग्दर्शनात देखील पदार्पण केलं आहे. तिने दिग्दर्शित केलेला 'रेनबो' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. क्रांतीने 2017 मध्ये तिने एनसीबीचे (NCB) मुंबई विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. करार, जत्रा, पिपाणी, मर्डर मिस्ट्री या चित्रपटांमध्ये क्रांतीने काम केलं. जत्रा सिनेमातील क्रांतीच्या 'कोंबडी पळाली' या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
राजकारणात उतरण्याच्या चर्चांना क्रांतीकडून पूर्णविराम
दरम्यान राजकारणात नाही पण समाजासाठी काम करायचं आहे, असं क्रांती रेडकरने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं. अनेक दिवसांपासून वानखडे परिवारातील कोणीतरी एक सदस्य राजकीय आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. अभिनेत्री क्रांती रेडकर राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं देखील म्हटलं जात होतं. परंतु क्रांतीने राजकारण नाही पण समाजासाठी काम करायचं आहे, असं म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
हेही वाचा