Mumbai : संभोग करताना प्रियकराचा मृत्यू, पोलीस वैद्यकीय अहवालाच्या प्रतीक्षेत
कुर्ल्यातील एलबीएस रोडवर असलेल्या जीएसके हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी हॉटेलमध्ये आपल्या प्रेयसीशी लैंगिक संबंध ठेवताना एकाचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : एक हैराण करणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. शारिरीक संबंध ठेवताना 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, की मृत व्यक्तीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या किंवा हिंसेच्या खुणा आढळलेल्या नाहीत. मात्र, सध्या या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करत तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस वैद्यकीय अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.
कुर्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील एलबीएस रोडवर असलेल्या जीएसके हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवताना अचानक वृद्धाला अस्वस्थ वाटू लागलं. यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर जोडीदाराने रुग्णालयात नेलं असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्देवी वृद्धाने सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका 40 वर्षीय महिलेसह हॉटेलमध्ये चेक- इन केले. काही वेळाने महिलेने हॉटेलच्या रिसेप्शनला संपर्क साधून तो बेशुद्ध पडल्याचे सांगितले. त्याननंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी लगेच स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर महिलेची स्थानिक पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्या वृद्धासोबत हॉटेलमध्ये चेक इन केलेली महिला मुंबईतीलच रहिवासी असून एका खासगी कंपनीत काम करत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. घटनेच्या वेळी त्या महिलेच्या जोडीदाराने दारुही पिल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. दारु पिल्यानंतर मात्र तो बेशुद्ध पडला.
कुर्ला पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक माहितीच्या आधारे, या प्रकरणात आकस्मिक मृत्यू झाल्याची (एडीआर) नोंद केली आहे. अद्याप मृत्यूचे नेमके कारण समजलेलं नाही, त्यासाठीच पोलीस वैद्यकीय अहवालाची (शवविच्छेदन अहवालाची) प्रतीक्षा करत आहेत. मृत व्यक्तीचा गळा दाबून खून झाला आहे की नाही याचीही शक्यता तपासली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोणत्याही हॉटेल्सना योग्य आयडी प्रूफशिवाय राहण्यासाठी रुम देण्यास मनाई आहे, या प्रकरणात असं काही आढळलं तर त्या दोघांना रुम देणाऱ्या हॉटेलवरही कारवाई करू, अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हॉटेलमध्ये प्रवेश देण्यापूर्वी ओळखपत्र दाखवणे गरजेचे आहे. जर विनापरवानगी हॉटेलने दोघांना परवानगी दिली असेल तर हॉटेलवरही कारवाई करण्यात येणार आहे