Nagpur News: शेफ विष्णू मनोहरांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, फेसबुक अकाउंट हॅक; पेजवरील अश्लील मजकूर
Nagpur News: फेसबुक पेजवरील अश्लील मजकुरामुळे चाहत्यांचे गैरसमज होत असल्यामुळे विष्णू मनोहर कमालीचे व्यथित झाले आहे.

Nagpur News: महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर (Vishnu Manohar) यांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले आहे. त्यामागील कारण म्हणजे त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक (Facebook Account Hacked) केल्यानंतर हॅकर्सनी त्यावर अश्लील मजकूर टाकल्यामुळे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का तर बसलाच आहे, शिवाय फेसबुक पेजवरील अश्लील मजकुरामुळे चाहत्यांचे गैरसमज होत असल्यामुळे विष्णू मनोहर कमालीचे व्यथित झाले आहे.
हॅकर्समुळे मी हतबल झाल्याची प्रतिक्रिया देत असतांना त्यांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले आहे. परिणामी, अशा पद्धतीने माझ्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या अशा हॅकर्सला पोलीस आणि सरकारने धडा शिकवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोबतच चाहत्यांनी माझ्यावर विश्वास कायम ठेवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
मेक्सिकोमधून हे फेसबुक पेज हॅक- विष्णू मनोहर
महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे "मास्टर रेसिपी" नावाचे अत्यंत लोकप्रिय फेसबुक पेज गेले अनेक दिवस अज्ञात हॅकर्सने हॅक केले असून त्यावर सातत्याने अश्लील मजकूर टाकले जात आहे. नागपूर, पुणे, मुंबई सर्वच ठिकाणी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही गेले दहा दिवस पोलीस या हॅकर्सचा शोध लावू शकलेले नाही. प्रथमिक माहितीनुसार मेक्सिकोमधून हे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे, एवढेच आतापर्यंत समजले आहे. मात्र या प्रकारामुळे रोज चाहत्यांना उत्तर देणे कठीण होऊन बसले असून रोज हजारोंच्या संख्येने फोन आणि मेसेजेस येत आहेत, अशी प्रतिक्रिया देताना विष्णू मनोहर ढसाढसा रडू लागले.
सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या अशा हॅकर्सला धडा शिकवा-- विष्णू मनोहर
अशा पद्धतीने सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या अशा हॅकर्सला पोलीस आणि सरकारने धडा शिकवावा अशी मागणी त्यांनी केली. सोबतच चाहत्यांनी माझ्यावर विश्वास कायम ठेवावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. अतिशय मेहनतीने आणि चाहत्यांच्या प्रेमापोटी मी हे कार्य करत होतो. यातून आर्थिक लाभ मिळवणे हा उद्देश कधीही नव्हता, नसणार ही आहे. मात्र एक खाद्य संस्कृति साऱ्यापर्यंत रुजवण्याचे हे माध्यम माझ्यासाठी होते. एकाएक हा असा प्रकार घडल्याने मी प्रचंड व्यथित झालो आहे. अशी प्रतिक्रिया शेफ विष्णू मनोहर यांनी बोलताना दिली आहे.
हे ही वाचा
























