एक्स्प्लोर

पीडितेला अमानुष मारहाण, चष्म्याच्या काचा डोळ्यांत, हाता-पायांवर जखमा; पोस्टमार्ट रिपोर्टमधून धक्कादायक तपशील उघड

Kolkata Case : कोलकात्यात महिला डॉक्टरची अत्याचार करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आणि त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटल्याचे पाहायला मिळाले.

Kolkata Case : पश्चिम बंगालची (West Bangal) राजधानी कोलकात्यातील (Kolkata Crime News Updates) आर. जी रुग्णालयातील महिला डॉक्टरची बलात्कार करुन निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणानं संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. अशातच आता या प्रकरणातील पीडितेचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यातून धक्कादायक आणि संतापजनक माहिती उघडकीस आली आहे. आरोपी संजय रॉयनं पीडित डॉक्टरवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी तिनं त्याचा प्रतिकार केला. त्यावेळी नराधमानं तिला अमानुष मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केली आणि बलात्कार केला. नराधम एवढ्यावरच थांबला नाहीतर, त्यानं त्यानंतर तिला मारून टाकलं. 

शवविच्छेदन अहवालानुसार, पीडितेच्या हात आणि चेहऱ्यावर जखमा होत्या. पीडित डॉक्टरला नराधमान अमानुषपणे मारहाण केल्याचं समोर आलं होतं. पीडितेच्या चष्म्याच्या काचा फुटून तिच्या डोळ्यांमध्ये गेल्या होत्या. त्यामुळे डोळ्यांतून रक्तस्राव झालेला. नराधमानं पीडितेला मारहाण करताना तिचं डोकं भिंतीवर जोरात आपटलं होतं. त्यामुळे पीडितेच्या डोक्याला गंभीर इजादेखील झाली होती. पीडितेचं डोकं भिंतीवर आपटताना आरोपीनं तिच्या तोंडावर दाब दिला होता. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरही जखमा झाल्या.

नराधन एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं पीडितेचा अमानुष छळ सुरू ठेवला. मारहाण करुन झाल्यानंतर आरोपीनं तिचा गळा आवळला. त्यामुळे तिच्या मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांना तरुणीच्या गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. तसेच, पीडितेवर अत्याचार करताना आरोपी संजय रॉय मद्यधुंद अवस्थेत असल्याचंही समोर आलं आहे. त्याच्याही हातावर आणि चेहऱ्यावर जखमा आहेत. त्यावरुन पीडितेनं स्वत:ला वाचवण्यासाठी तीव्र प्रतिकार केल्याचं स्पष्ट होत आहे.

ब्ल्यूटूथ हेडफोनमुळे आरोपी गजाआड

पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक ब्ल्यूटूथ हेडफोन सापडला. त्यानंतर या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. त्यावेळी आरोपीही चौकशीसाठी आला होता. त्यावेळी पोलिसांना घटनास्थळी सापडलेली ब्ल्यूटूथ आरोपीच्या फोनशी कनेक्ट झाली. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आणि तपासला, त्यावेळी त्याच्या फोनमध्ये अनेक हिंसक अश्लील व्हिडीओ होतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय रॉय हा विकृत होता. आरोपीच्या मोबाईलमध्ये ज्या प्रकारचा अश्लील/घृणास्पद मजकूर आढळला, तो सामान्यत) इतर लोकांच्या मोबाईलमध्ये दिसत नाही. 

नेमकं काय घडलं? 

शुक्रवारी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर कोलकातामध्ये खळबळ उडाली आहे. शासकीय आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका 31 वर्षीय पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर गुरुवारी रात्री लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. चेस्ट मेडिसिन विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये अधिकाऱ्यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. महिला डॉक्टरच्य मृतदेहावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. 

महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, जर पोलिसांनी रविवारपर्यंत या प्रकरणाची उकल केली नाही तर ते हे प्रकरण सीबीआयकडे सोपवतील.

दुसरीकडे, आंदोलक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी सात दिवसांची मुदत दिल्याची टीका करत तातडीनं कारवाईची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. न्यायालयीन चौकशी, दोषींना फाशीची शिक्षा, पीडितेच्या कुटुंबीयांना पुरेशी भरपाई आणि रुग्णालयांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणाऱ्या तीन जनहित याचिका कोलकाता उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. सरन्यायाधीश टीएस शिवग्ननम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ मंगळवारी या जनहित याचिकांवर सुनावणी करणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget