Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis, दावोस : देवेंद्र फडणवीस दावोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis, दावोस : "सहा राज्यांना दावोसला येण्याची परवानगी मिळाली त्यात महाराष्ट्र देखील होता. भारत आणि ट्रम्प यांचीच चर्चा इथे अधिक झाली. एक भारत म्हणून आम्ही आमची भूमिका मांडली. कंन्ट्री डायलॉकमध्ये चांगली भूमिका आम्ही सर्व राज्यांनी मांडली. वॉटर सस्टेनेबिलिटीसाठी एनर्जी ट्रान्झिजनसाठी आपण काय काय केलंय हे आपण जागतिक व्यासपीठावर सांगू शकलो. ग्लोबल सीईओंसोबत चर्चा करता आली. महाराष्ट्र पहिलं पाऊल कसं पुढे टाकेल यासंदर्भात चर्चा करता आली. ग्लोबल इन्व्हेस्टर्स महाराष्ट्रात गुंतवणूक करु इच्छितात. आपण 61 एमओयू केले आहेत, ज्यात 15.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक तर रोजगार 15.95 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. हरित ऊर्जा ग्रीन हायड्रोजन डेटा सेंटर शिक्षण वित्त आमटोमोबाइल मीडिया मेटल हेवी इंडस्ट्रिज आहेत", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते दावोसमधून बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सगळीकडे रोजगार राज्यात आलाय. एमएमआरमध्ये असेल किंवा विदर्भात 5 लाख कोटी रुपयांचे एमओयू आले आहेत. मराठवाडा शक्तिस्थळ म्हणून उदयास येत आहे. 98 टक्के ग्रोथ एफडीआय स्वरूपात आहे. ही गुंतवणुकीमुळे मोठी रोजगार निर्मिती होईल. मागच्या वेळेसचे सर्वच करार मार्गी आपण लावू शकलो आहोत. सर्वाधिक करार करण्यात आपण पहिल्या क्रमांकावर आहे. दावोस आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचं केंद्र आहे. भारतातील कंपन्यांसोबत करार केलेले आहेत. कारण त्यांच्या कंपन्यांचे एफआयआय असतात त्यांची इच्छा असते. त्यामुळे ती लोकं देखील तिथेच येतात. मंत्रालयात देखील करार करु शकतात. मग आपण का मॅग्नेटिक महाराष्ट्र करतो तर त्यामुळे नेटवर्किंग होतं आणि त्यामुळे सर्व भेटतात आणि विचारांची देवाण घेवाण होते.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राची आणि भारताची पावर वाढत आहे. एमओयू परिवर्तित होणार आहे हा प्रश्न उभा केला…महाराष्ट्राचा एमओयू कन्हव्हर्ट करण्याचा रेट हा 65 टक्के आहे. मागील वर्षातील हा रेट आपला 85 टक्के दावोसचा होता. आता करार झालेले सर्व सिरीअस प्लेअर आहेत. महाराष्ट्र डेटा सेंटरचं ग्लोबल हब होत आहे. काही सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला उत्तर देण्याच्या मी भानगडीत नाही आहे. माझी टीम आली त्यांचे अभिनंदन करतो.
उदय सामंत म्हणाले, काही लोकं संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते ती दूर झाली आहे. विदर्भापासून ते कोकणापर्यंत गुंतवणूक झाली आहे. रत्नागिरीतही माझ्या जिल्ह्यात गुंतवणूक मोठी आहे. मला दोनदा संधी मिळालेली होती. मी उद्योगमंत्री आहे हे राजकीय भाग्य आहे. उद्योगमंत्री म्हणून माझा देखील काटेकोर प्रयत्न करेल ती कन्व्हर्ट व्हावी. परत ही गुंतवणूक जाणार नाही याची खबरदारी घेऊ.. महाराष्ट्राची आर्थिक प्रगती नक्की होईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट