एक्स्प्लोर

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?

Devyani Pharande Meets Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर आले आहेत.

Devyani Pharande Meets Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) दारूण पराभव झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पहिल्यांदाच तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले आहेत. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा ते आढावा घेणार आहेत. मात्र राज ठाकरे नाशिकमध्ये (Nashik News) दाखल होताच भाजपच्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या (Nashik Central Vidhan Sabha Constituency) आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी त्यांनी भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार होती. भाजपकडून देवयानी फरांदे, शिवसेना ठाकरे गटाकडून वसंत गीते (Vasant Gite) आणि मनसेकडून अंकुश पवार (Ankush Pawar) यांना तिकीट देण्यात आले होते. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात मनसेच्या एन्ट्रीने भाजपची डोकेदुखी वाढली होती. मात्र, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अंकुश पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. यामुळे देवयानी फरांदे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला होता. अंकुश पवार यांच्या माघारीनंतर या मतदारसंघात देवयानी फरांदे विरुद्ध वसंत गीते असा दुहेरी सामना रंगला. यात देवयानी फरांदे यांचा विजय झाला होता. 

राज ठाकरेंच्या भेटीवर देवयानी फरांदेंची प्रतिक्रिया 

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल होताच देवयानी फरांदे यांनी त्यांची भेट घेतली.  विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराने माघार घेतल्याने देवयानी फरांदे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले. यावेळी पत्रकारांशी बोलताना देवयानी फरांदे म्हणाल्या की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याचे नेते आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ते पहिल्यांदाच नाशिकमध्ये आलेत. त्यामुळे मी त्यांची भेट घेतली. आगामी कुंभमेळा, नाशिकचा विकास या विषयांवर राज ठाकरे यांची भेटीदरम्यान चर्चा झाली. नाशिक मध्य मतदारसंघात मनसेने विधानसभा निवडणुकीत उमेदवार मागे घेतला, त्याचा निश्चितच मला फायदा झाला. मात्र, त्या संदर्भात आज कुठलीही चर्चा झाली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून आढावा

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये दाखल होताच राज ठाकरे यांनी आढावा घायला सुरुवात केली आहे. पक्षातील निवडक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करत आहेत. पक्षातील काही नाराज, जुन्या आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी देखील राज ठाकरे चर्चा करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेचा आढावा राज ठाकरे घेत आहेत. त्यामुळे पक्ष संघटनेत काही बदल होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?

Guardian minister: नाशिकसाठी भाजपचा आग्रह तर शिवसेनाही सोडायला तयार नाही; पालकमंत्रीपदामागचं राजकारण नेमकं काय?

महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ, पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? भारतावर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ, पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? भारतावर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
BRICS Summit: BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
Embed widget