एक्स्प्लोर

Dhule Crime : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गरोदर राहिलेल्या मुलीचा गर्भपातानंतर मृत्यू

Dhule Crime : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना धुळे जिल्ह्यात घडली. धक्कादायक म्हणजे गरोदर राहिलेल्या मुलीचा गर्भपातानंतर मृत्यू झाला. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dhule Crime : लग्नाचं आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार (Rape) केल्याची घटना धुळे (Dhule) जिल्ह्यात समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित मुलगी गरोदर (Pregnant) राहिली. मात्र गर्भपात केल्यानंतर अति रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी अत्याचार करणारा आरोपी राज सिकलकर याला अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मुलीचा गर्भपात करणारी नर्स प्रमिला पवार पसार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

धुळ्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावाजवळ असलेल्या घोड्यामाळ इथे ही घटना घडली. आरोपी राज सिकलकरने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिचा एका खाजगी रुग्णालयातील नर्सने पैसे घेऊन गर्भपात केला. परंतु गर्भपातानंतर अति रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अति रक्तस्त्राव झाल्यामुळे मुलीचा मृत्यू

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित नर्स प्रमिला पवार आणि त्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या राज सिकलकर यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील अल्पवयीन मुलगी ही सोळा वर्षाची असून यातील आरोपी राज दीपक सिकलकरने या अल्पवयीन मुलीला वेळोवेळी लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला. मुलगी गरोदर असल्याचं समजल्यानंतर तिच्या आईने तिला धुळे शहरातील साक्री रोडवरील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेलं. इथे कार्यरत असलेल्या प्रमिला पवार नावाच्या नर्सने पीडितेच्या कुटुंबीयांकडून दहा हजार रुपयांची मागणी केली. कुटुंबियांनी तिला पैसे दिल्यानंतर मुलीचा गर्भपात करण्यात आला आणि या मुलीला त्यानंतर पुन्हा गावी नेण्यात आले. मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाला.

अल्पवयीन मुलीचा घरातच गर्भपात

पिंपळनेर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रमिला पवार हिला ताब्यात घेण्यासाठी खाजगी रुग्णालय गाठले असता तोपर्यंत ती पसार झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे प्रमिला पवार हिने या अल्पवयीन मुलीचा गर्भपात घरी नेऊन केला असल्याचे समोर आलं आहे. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी राज सिकलकरला अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget