RuPay Credit Card वापरताय? UPI सोबत लिंक करण्याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का?
RuPay Credit Card : युपीआय पेंमेंटसाठीही आता क्रेडिट कार्ड वापरता येतं. RuPay) क्रेडिट कार्ड युपीआयसोबत लिंक करण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या.
RuPay Credit Card Benefits : गेल्या काही काळात भारतात डिजिटल पेमेंटमध्ये (Digital Payment) वाढ झाली आहे. युपीआय पेंमेंटसाठीही आता क्रेडिट कार्ड वापरता येतं. ही सुविधा सध्या फक्त रुपे क्रेडिट कार्ड (RuPay Credit Card) ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. जर तुमच्याकडेही रुपे RuPay क्रेडिट कार्ड आहे, तर तुम्ही हे क्रेडिट कार्ड युपीआयसोबत लिंक करु शकता आणि क्रेडिट कार्ड (RuPay Credit Card) द्वारे थेट पेमेंट (UPI Payment) करु शकता. त्यामुळे व्यवहार आणखी सोपा झाला आहे, असं असली तरी याचे काही फायदे आणि तोटेही आहेत.
क्रेडिट कार्डद्वारे युपीआय पेमेंट करण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या.
UPI ला लिंक करण्याचे काय फायदे आहेत? (RuPay Credit Card UPI Benefits)
ग्राहकांना व्यवहार सुविधा मिळते
UPI शी क्रेडिट कार्ड लिंक केल्याने छोट्या व्यवहारांसाठी क्रेडिट कार्ड वापरण्याची सोय वाढते. क्रेडिट कार्ड UPI शी लिंक असल्यास, UPI स्वीकारणाऱ्या कोणत्याही ठिकाणी व्यवहार करणं सोपं होतं.
बक्षिसे मिळतात
क्रेडिट कार्डने UPI पेमेंट केल्याने ग्राहकांना विविध बक्षिसे मिळतात. तुम्हाला या सर्व व्यवहारांवर रिवॉर्ड्स मिळवू शकतात. या रिवॉर्ड्समध्ये तुम्हाला कॅशबॅक, पॉइंट्स आणि व्हाउचर मिळतात.
क्रेडिट लिमिट
डेबिट कार्डपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड जास्त लिमिटसह येतात. त्यामुळे ग्राहकाला जास्त खरेदी करणं शक्य होतं.
UPI सोबत क्रेडिट कार्ड लिंक करण्याचे तोटे काय? (RuPay Credit Card UPI Payment Con)
अधिक खर्च करण्याची प्रवृत्ती
UPI शी क्रेडिट कार्ड लिंक केल्याने जास्त खर्च होण्याचा धोका वाढू शकतो. UPI वापरण्यास सोपा असल्याने ग्राहक अनेकदा त्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करतात. एका क्लिकवर पैसे पाठवण्याच्या सवयीमुळे ग्राहक जास्त खरेदी करतात.
कर्जाच्या सापळ्यात अडकण्याची शक्यता
अनेक क्रेडिट कार्ड्समध्ये आकर्षक रिवॉर्ड स्कीम असतात. कॅशबॅक किंवा ट्रॅव्हल पॉइंट असे रिवॉर्ड, लोकांना UPI व्यवहारांसाठी क्रेडिट कार्ड वापरण्यास प्रवृत्त करतात. यामुळे ग्राहक त्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करतात. यानंतर ग्राहकाला क्रेडिट कार्डचं बिल भरणे शक्य न झाल्यास कर्जात अडकण्याची शक्यता असते. शिवाय, बिल वेळेवर न भरल्यास, ग्राहकाला जास्त व्याजासह बिल भरावं लागत, यामुळे नुकसान होतं.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक तज्ज्ञ, आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. )