IND vs NZ Champions Trophy 2025 Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
IND vs NZ Champions Trophy 2025 Final: चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याबद्दल सध्या साऱ्यांचीच बरीच चर्चा सुरू आहे.

IND vs NZ Champions Trophy 2025 Final: 2017 मध्ये अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी टीम इंडिया आज न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा सध्या या सामन्यावर खिळल्या आहेत. आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी अम्पायर्स आणि मॅच रेफरी यांची नावं जाहीर करण्यात आली आहे. जाणून घेऊयात, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यासाठी महत्त्वाच्या भूमिकेत असलेले अम्पायर्स आणि मॅच रेफरी कोण?
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याबद्दल सध्या साऱ्यांचीच बरीच चर्चा सुरू आहे. आता आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी अधिकाऱ्यांची नावंही जाहीर केली आहेत. याअंतर्गत, मैदानावरील पंच, थर्ड अंपायर आणि मॅच रेफरी या दोघांचीही नावं जाहीर करण्यात आली आहेत. टीम इंडियानं सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अशातच आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची ट्रॉफी कोण उंचावणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
IND vs NZ सामन्यासाठी ग्राऊड अम्पायर्स कोण?
9 मार्च रोजी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पॉल रीफेल आणि रिचर्ड इलिंगवर्थ ग्राउंड अम्पायर्स असतील. हे दोघेही आयसीसीच्या एलिट पंच पॅनेलचे सदस्य आहेत. दोघेही सेमीफायनल्सच्या सामन्यासाठीही अम्पायर्स होते. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात इलिंगवर्थ अम्पायर होते, तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनल्सच्या सामन्यात रीफेल यांनी अम्पायर म्हणून भूमिका बजावली होती. इलिंगवर्थ यांनी चार वेळा आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम अम्पायरचा पुरस्कार जिंकला आहे. अलिकडेच त्यांनी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक आणि 2024 च्या टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यातही अम्पायर होते. ते ग्रुप स्टेज टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्या ग्रुप सामन्यातही अम्पायर होते.
View this post on Instagram
श्रीलंकेचे रंजन मदुगले हे रविवारी टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी मॅच रेफरी असतील.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल ओरुक.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















