सरकारी सोन्याचे दर ठरले, सोमवारपासून पाच दिवसांसाठी सुवर्ण रोखे खुले; ऑनलाईन खरेदीवर किती सुट?
सरकारी सुवर्ण रोखे (Gold Bond) सोमवारपासून पाच दिवसांसाठी उघडण्यात येणार आहेत. सोन्याच्या (Gold) या हप्त्याची किंमत 6,263 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे.
Gold Price : सरकारी सुवर्ण रोखे (Gold Bond) सोमवारपासून पाच दिवसांसाठी उघडण्यात येणार आहेत. सोन्याच्या (Gold) या हप्त्याची किंमत 6,263 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. सरकारी गोल्ड बाँड योजना 2023-24 सीरीज-4 या महिन्याच्या 12 ते 16 तारखेपर्यंत खुली असणार आहे. ऑनलाइन खरेदीवर चांगली सूट मिळणार असल्यानं ग्राहकांना फायदा होणार आहे.
2023-24 या आर्थिक वर्षासाठी सार्वभौम गोल्ड बाँडची चौथी सीरीज येत आहे. ही सीरीज सोमवारपासून सुरु होत आहे. या सुवर्ण रोख्यामध्ये हमी परतावा उपलब्ध आहे. याशिवाय काही लोकांना सूटही मिळते. ही सवलत अशा लोकांसाठी उपलब्ध आहे, जे ऑनलाइन ऑर्डर करतात. डिजिटल पेमेंट देखील करतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की सरकारी गोल्ड बाँड (एसजीबी) सोमवारपासून पाच दिवसांसाठी उघडेल. सोन्याच्या या हप्त्याची निर्गम किंमत 6,263 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. सरकारी गोल्ड बाँड योजना 2023-24 सीरीज-4 या महिन्याच्या 12 ते 16 तारखेपर्यंत खुली असेल. विशेष म्हणजे या गुंतवणुकीत तुम्हाला हमखास परतावाही मिळतो. सध्या सुवर्ण रोख्यांची मागणी वाढत आहे. प्रत्येक वेळी त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोणाला मिळणार सूट?
सेंट्रल बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बॉण्डची किंमत प्रति ग्रॅम सोन्यासाठी 6,263 रुपये आहे. भारत सरकारनं ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना दर्शनी मूल्यावर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँड्सची इश्यू किंमत 6,213 रुपये असेल असे आरबीआयने म्हटले आहे.
गोल्ड बाँड कुठे खरेदी कराल?
SGBs शेड्युल्ड कमर्शियल बँका (स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), सेटलमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), पोस्ट ऑफिस, नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड यामाध्यमातून तुम्ही गोल्ड बाँड खरेदी करु शकता.
सोन्याचे रोखे कोण आणि किती खरेदी करू शकतात?
केंद्रीय बँक खरेतर भारत सरकारच्या वतीने सुवर्ण रोखे जारी करते. हे फक्त निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांना विकले जाऊ शकतात. कमाल सदस्यत्व मर्यादा व्यक्तींसाठी 4 किलो, HUF साठी 4 किलो आणि ट्रस्ट आणि तत्सम घटकांसाठी 20 किलो आहे. सोन्याची भौतिक मागणी कमी करण्याच्या उद्देशाने गोल्ड बॉण्ड योजना नोव्हेंबर 2015 मध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या:
Gold Price Today : सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण; तुमच्या शहरातील लेटेस्ट दर पाहा