Gold Price Today : सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण; तुमच्या शहरातील लेटेस्ट दर पाहा
Gold Price Today : गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 5 फेब्रुवारी 2024 रोजी, 24 कॅरेट सोन्याची किंमत 6322 रुपये प्रति ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 5795 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Silver Rate Today, 5th February 2024 : जागतिक अर्थव्यवस्था आणि इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची क्षमता यासारख्या जागतिक घटकांचाही भारतीय बाजारातील सोन्याच्या किमतींवर प्रभाव पडतो. यामुळे सोने-चांदीच्या किमतीत बदलतात. आज सोमवारी सोन्याचा भाव घसरले आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं स्वस्त झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 5 फेब्रुवारी 2024 रोजी, 24 कॅरेट सोन्याची किंमत 6322 रुपये प्रति ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 5795 रुपये प्रति ग्रॅम आहे.
आज सोने-चांदीचा दर काय?
आज सोनं स्वस्त झालं आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात 150 रुपयांची घसरण झाली आहे. आज, 5 फेब्रुवारी 2024 रोजी, संपूर्ण भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या (Gold Rate Today) किमती वेगवेगळ्या आहेत. 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम (24K Pure Gold Price) सोन्यासाठी 63,220 रुपये मोजावे लागत आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची सरासरी किंमत 57,950 रुपये होती, तर 18 कॅरेट सोन्याची 47,410 रुपये प्रतितोळा आहे.
आज चांदीचा भाव काय? (Silver Price Today)
आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदी 300 रुपये प्रतिकिलो दराने स्वस्त झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 75,200 रुपये प्रति किलो आहे.
देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)
- मुंबई - मुंबईत सोन्याचा दर 150 रुपयांनी स्वस्त झाला असून आज 24 कॅरेट सोन्याचा दर 63220 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
- दिल्ली - दिल्लीत सोनं 170 रुपयांनी स्वस्त झालं असून आज सोन्याचा 63370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. (Delhi Gold Rate Today)
- कोलकाता - कोलकात्यात सोन्याचा दर 120 रुपयांनी कमी झाला असून आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 63120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
- चेन्नई - चेन्नईत आज सोन्याचा दर 63820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, सोन्याचा दर 220 रुपयांनी स्वस्त झाला आहे. (Chennai Gold Rate Today)
महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra 24K Gold Rate)
- पुणे - आज पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63220 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate) आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 57950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- नाशिक - 24 कॅरेट सोने 63250 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nashik Gold Rate) आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 57980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- नागपूर - 24 कॅरेट सोने 63220 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nagpur Gold Rate) आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 57950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 63220 रुपये प्रति 10 ग्रॅम (Kolhapur Gold Rate)आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 57950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Gold Bond Scheme : स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी! गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करा; RBI ची खास योजना