देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ, सोनं महाग होण्याचं कारण काय?
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. आज (19 जानेवारी) सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) किरकोळ वाढ झाली आहे.

Gold Silver Price : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. आज (19 जानेवारी) सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) किरकोळ वाढ झाली आहे. देशांतर्गत तसेच परदेशी बाजारात (foreign markets) सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. मध्य-पूर्वेत सुरु असलेल्या तणावामुळं सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात सोने 100 रुपयांनी वाढले आहे. चांदीच्या दरातही थोडी वाढ झाली आहे.
देशांतर्गत बाजारात सोने महागले
देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या-चांदीचे भाव खालच्या पातळीवर मजबूत होत आहेत. MCX वर सोन्याची किंमत सुमारे 100 रुपयांच्या वाढीसह 61875 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा भाव 20 रुपयांच्या किरकोळ वाढीसह 71635 रुपये प्रति किलोवर होता. आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. COMEX वर सोन्याचा दर 2020 डॉलरच्या पुढे गेला आहे. चांदीची किंमत देखील किंचित मजबूतीसह 22.83 प्रति ऑनवर डॉलरवर व्यवहार करत आहे.
सोन्याचा भाव 70000 पार पोहोचणार
2024 मध्ये सोनं 70,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. चालू जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक राजकीय तणावामुळे सोन्याचा भाव यावर्षी प्रति 10 ग्रॅम 70,000 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचेल, असे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Gold Rate Today : सोन्याचा दर 70000 पार पोहोचणार, जागतिक बाजारात सोन्याचे फ्युचर्स वाढले; आज सोने-चांदीचा भाव काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
