(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Rate Today : आज सोने-चांदी खरेदी करण्याच्या विचारात आहात? तुमच्या शहरात लेटेस्ट दर काय?
Gold Price Today : मुंबईत आज सोन्याचा दर 22 कॅरेट सोन्यासाठी 5,775 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा 6,300 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Silver Rate Today, 21 December 2023 : तुम्ही ख्रिसमस (Christmas) किंवा नवीन वर्षाच्या (New Year) आधी सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर त्याआधी आज सोने-चांदीचा दर (Gold Silver Price Today) काय आहे ते तपासा. आज 21 डिसेंबर 2023 रोजी सोने-चांदीची किंमत स्थिर आहे. बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला होता. सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 380 रुपयांची वाढ झाली होती तर, चांदीच्या दरातही वाढ झाली होती. पण आज मात्र सोने-चांदीचा दर स्थिर आहे. मुंबईत आज सोन्याचा दर 22 कॅरेट सोन्यासाठी 5,775 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा 6,300 रुपये प्रति ग्रॅम आहे.
आज सोन्याचा दर काय?
गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज गुरुवारी सोन्या-चांदीच्या किमतीत कोणताही बदल झाला नसूने सोने-चांदीचा भाव जैसे थे आहे. आज 21 डिसेंबर रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Rate Today) 57,750 रुपये, 18 ग्रॅम 47,250 रुपयांवर आणि 24 कॅरेटचा सोन्याचा भाव 63,000 रुपये इतका आहे.
चांदीचा भाव
आज चांदीचा भावही बुधवार प्रमाणे कायम आहे. बुधवारी मात्र चांदीच्या किमतीत 1000 रुपयांची वाढ झाली होती. आज चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेली नाही. एक किलो चांदीची किंमत (Silver Rate Today) 78,500 रुपये आहे.
देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)
- मुंबई - मुंबईत सोन्याचा दर 63000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
- दिल्ली - दिल्लीत सोनं 63150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. (Delhi Gold Rate Today)
- कोलकाता - कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 63000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
- चेन्नई - चेन्नईत आज सोन्याचा दर 63550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)
महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)
- पुणे - 63000 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
- नाशिक - 24 कॅरेट सोने 63030 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)
- नागपूर - 24 कॅरेट सोने 63000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)
- कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 63000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)
लग्नसराईत सोने खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
सोने खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला फसवणुकीपासून वाचवू शकता. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर सर्व प्रथम त्या दागिन्यांवर सहा क्रमांकाचा हॉलमार्क आहे का ते तपासा. नियमानुसार कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाही.