एक्स्प्लोर

कांदा निर्यातबंदीचा मोठा फटका, परकीय चलनात  649 कोटींची तूट;  तर 8 लाख मेट्रीक टन कांद्याची निर्यात कमी

कांदा निर्यातबंदीचा मोठा फटका बसला आहे. कांदा निर्यात बंदीमुळं परकीय चलनात 649 कोटी रुपयांची तूट आली आहे. तर 8 लाख 17 हजार 530 मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी झाली आहे.

Onion Export Ban News : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) चिंतेत आहे. कारण कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export Ban) हटवून देखील कांद्याचे दर वाढत नाहीत. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) बसत आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं केलेल्या कांदा निर्यातबंदीचा मोठा फटका बसला आहे. कांदा निर्यात बंदीमुळं परकीय चलनात 649 कोटी रुपयांची तूट आली आहे. तर 8 लाख 17 हजार 530 मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी झाली आहे.

कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारकडून नेहमीच धरसोडीचे धोरण अवलंबले जात आहे. याचा परिणाम देशाच्या परकीय चलणावर होत आहे. गेल्या आर्थिक वर्षात परकीय चलनात 649 कोटी रुपयांची तूट तर 8 लाख 17 हजार 530 मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी झाल्याची बाब अपेडाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. सन 2023 ते 24  या आर्थिक वर्षामध्ये 17 लाख 7 हजार 998 मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे. यातून 3 हजार 874 कोटी रुपयांचे चलन मिळाले आहे. तर सन 2022 ते 23 या आर्थिक वर्षामध्ये 25 लाख 25 हजार 258  मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे. यातून 4 हजार 522 कोटी रुपयांचे चलन मिळाले आहे.

केंद्र सरकारनं अटी शर्ती न लावता संपूर्ण कांदा निर्यातबंदी उठवावी 

दरम्यान, यावर्षी कांद्यावर निर्यातबंदी लावल्यामुळं कांद्याची निर्यात ही कमी झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं तातडीने अटी शर्ती न लावता संपूर्ण कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ञ व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केली आहे. 

8 डिसेंबर 2023 रोजी सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर घातली होती बंदी

दरवर्षी कांद्याच्या मुद्यावरुन देशातील राज्यातील वातावरण चांगलेच गरम होत असते. कारण सरकारच्या धोरणाचा नेहमीच कांदा उत्पादकांना फटका बसतो. यावेळी देखील सरकारच्या धोरणाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला. सरकारनं 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी घालताना सरकारनं 31 मार्चपर्यंत बंदी उटवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, सरकारनं 31 मार्चला बंदी उठवली नाही. जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कांद्याची निर्यात बंदच राहणार असल्याचे सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.

निर्यातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका

निर्यातबंदीच्या आधी कांद्याचे दर हे 4000 ते 5000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेले होते. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत होता. मात्र, अचानक सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. 4000 ते 5000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेलेला कांदा 1000 ते 1500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आला. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. वेळोवेळी मागणी करुन देखील सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही. परिणाम शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. 

महत्वाच्या बातम्या:

शेतकऱ्यांना कुठं दिलासा तर कुठं फटका? कोणत्या बाजारपेठेत कांद्याला किती दर? सविस्तर माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget