Horoscope Today 14 March 2025: आज धुलिवंदनाचा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली! 12 राशींसाठी दिवस कसा असणार? आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 14 March 2025: 12 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 14 March 2025: पंचांगानुसार, आज 14 मार्च 2025, आजचा वार शुक्रवार. आज धुलिवंदन आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
कोणतेही काम करताना कंटाळा हा शब्द विसरून झाला. रटाळ कामे सुद्धा उत्तम करणार आहात
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
महिलांच्या भावविश्वात कर्तव्याला महत्त्व जास्त राहील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
खेळाडूंना नवीन संधी चालून येतील. त्याचा फायदा त्यांनी करून घ्यावा
कर्क रास (Cancer Horoscope Today)
काहीतरी नवीन गोष्टी करण्याकडे कल राहील. तुमच्या निर्मिती क्षमतेचे कौतुकही होईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे
कन्या रास (Virgo Horoscope Today)
मित्रांपासून सावधानता बाळगा, फसवणूक होण्याची शक्यता
तूळ रास (Libra Horoscope Today)
वैवाहिक सौख्य मध्ये तडजोड करावी लागेल, जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक ठरेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
व्यवसाय नोकरीमध्ये अचानक बदल संभवतो, कोणती गोष्ट वेळेवर झाली पाहिजे या मताशी ठाम राहाल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आपल्या आवडीनिवडी इतरांवर लाजण्याचा प्रयत्न कराल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
महिला येईल त्या परिस्थितीला धीटपणे सामोऱ्या जातील, नोकरीमध्ये काही अडचणी आल्या असतील त्या मार्गी लागतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
पूर्वीची जुनी दुखणी डोके वर काढतील, औषध उपचार आणि पथ्य पाणी वेळेवर घेणे आवश्यक आहे
मीन रास (Pisces Horoscope Today)
सतत उद्योग अशील आणि महत्त्वाकांक्षी राहाल, महिलांनी घरातील लोकांशी सख्य ठेवण्याचा प्रयत्न करावा
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा>>
Shani Transit 2025: वर्ष 2032 पर्यंत 'या' राशीच्या लोकांनी धीर ठेवा! शनिदेव अडचणी, कष्ट देणार? 'असे' उपाय अवश्य करा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )




















