शेतकऱ्यांना कुठं दिलासा तर कुठं फटका? कोणत्या बाजारपेठेत कांद्याला किती दर? सविस्तर माहिती एका क्लिकवर
सध्या काही भागात कांद्याच्या दरात (Onion Rate) घसरण झालीय, तर काही भागात कांद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळं कुठं कांदा उत्पादकांना दिलासा मिळतोय तर कुठं फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Onion Price : सध्या काही भागात कांद्याच्या दरात (Onion Rate) घसरण झालीय, तर काही भागात कांद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळं कुठं कांदा उत्पादकांना दिलासा मिळतोय तर कुठं फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर बाजार समिती (Solapur Market Committee) त कांद्याच्या दरात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं, तर कोल्हापूर बाजार समितीत (Kolapur Market Committee) कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. पाहुयात कोणत्या बाजारात कांद्याला नेमका किती दर मिळाला?
कोणत्या बाजारपेठेत कांद्याला किती दर?
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या बाजारपेठेत कांद्याचा भाव 30 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. निर्यातबंदी संपल्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारपेठेतील कांद्याचा हा सर्वाधिक भाव आहे. कोल्हापुरात 4290 क्विंटल आवक होऊनही किमान भाव 700 रुपये, कमाल 3000 रुपये आणि सरासरी भाव 1700 रुपये प्रतिक्विंटल राहिला. दुसरीकडे, मंगळवेढा येथेही कांद्याचा कमाल भाव 3000 रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे. मात्र, धुळे, सोलापूर, जालना आणि बारामतीचा समावेश असलेल्या अनेक मंडईंमध्ये किमान भाव केवळ 100 ते 300 रुपये प्रति क्विंटल आहे.
राज्यातील बहुतांश मंडईंमध्ये कांद्याची आवक कमी
महाराष्ट्र कृषी पणन मंडळानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश मंडईंमध्ये कांद्याची आवक कमी होती. निर्यातबंदी संपल्यानंतरही भावात फारसा फरक नसल्याने अनेक शेतकरी आता कांद्याची साठवणूक करत आहेत. खरीप हंगामातील कांदा साठवून ठेवता येत नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विकावे लागले. खरिपाचा कांदा लवकर सडू लागतो. तर रब्बी हंगामातील कांदा तातडीने विकण्याची सक्ती नाही. हा कांदा ऑक्टोबरपर्यंत साठवता येतो, त्यामुळे शेतकरी आता तो विकण्याऐवजी साठवून ठेवत आहेत.
कोणत्या बाजारात कांद्याची किती आवक?
बुधुवारी महाराष्ट्रातील केवळ तीन मंडयांमध्ये दहा हजार क्विंटलपेक्षा जास्त कांद्याची आवक झाली होती. पिंपळगाव-बसवंत येथे सर्वाधिक 20000 क्विंटल कांद्याची विक्री झाली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मंडईत 18662 क्विंटल कांद्याची आवक झाली. तिसऱ्या क्रमांकावर लासलगाव-विंचूर मंडई होती, जिथे 11700 क्विंटल आवक झाली. याशिवाय इतर बाजारपेठेत कांद्याची फारच कमी विक्री झाली. भुसावळमध्ये केवळ 30 क्विंटल, पुणे-पिंपरीमध्ये 13, मंगळवेढा येथे 82 आणि कामठीमध्ये केवळ 34 क्विंटल कांद्याची आवक झाली.
कोणत्या बाजारात कांद्याला किती दर?
जालना मंडईत किमान भाव 150 रुपये, कमाल 1300 रुपये आणि सरासरी 800 रुपये प्रतिक्विंटल
जुन्नरमध्ये किमान भाव फक्त 300 रुपये, कमाल 2600 रुपये आणि सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल
धुळ्यात किमान भाव केवळ 100 रुपये प्रतिक्विंटल होता. कमाल भाव केवळ 100 रुपये आणि सरासरी भाव 1600 रुपये
लासलगाव किमान भाव फक्त 500 रुपये, कमाल 1701 रुपये आणि सरासरी 1380 रुपये प्रतिक्विंटल
महत्वाच्या बातम्या: