Arrest Warrant Against Actor Sonu Sood: अभिनेता सोनू सूदवर अटकेची टांगती तलवार; अटक करुन हजर करण्याचे कोर्टाचे आदेश, प्रकरण नेमकं काय?
Arrest Warrant Against Actor Sonu Sood: अभिनेता सोनू सूद मोठ्या अडचणीत सापडला आहे. लुधियाना न्यायालयानं त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे.

Arrest Warrant Against Actor Sonu Sood: बॉलिवूडचा डॅशिंग अॅक्टर (Bollywood Actor) सोनू सूदच्या (Sonu Sood) अडचणींत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोनू सूदला कधीही अटक केली जाण्याची शक्यता आहे. कोर्टानं सोनू सूद विरोधात अटक वॉरंट जारी केलं असून त्याला अटक करून कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. अभिनेता सोनू सूदविरोधात लुधियाना न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे. हे प्रकरण 10 लाख रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित आहे. दरम्यान, न्यायालयानं वारंवार समन्स पाठवूनही सोनू सूद साक्ष देण्यासाठी हजर झाला नाही. त्यामुळे आता न्यायालयानं अभिनेत्याला अटक करून हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.
अभिनेता सोनू सूद मोठ्या अडचणीत सापडला आहे. लुधियाना न्यायालयानं त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. अभिनेत्याविरुद्ध हे वॉरंट न्यायिक दंडाधिकारी रमनप्रीत कौर यांनी जारी केलं आहे. असं सांगितलं जात आहे की, सोनू सूदला न्यायालयात साक्ष देण्यासाठी वारंवार समन्स पाठवण्यात आलं होतं, पण तो एकदाही हजर झाला नाही. या संदर्भात, आता त्याच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
प्रकरण नेमकं काय?
लुधियानाचे वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीविरुद्ध 10 लाख रुपयांच्या फसवणुकीचा खटला दाखल केला. यामध्ये त्याला बनावट रिझिका नाण्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आलं. त्याच प्रकरणात वकील राजेश खन्ना यांनी फसवणुकीचा आरोप केला आणि त्याच प्रकरणात साक्ष देण्यासाठी सोनू सूदला बोलावण्यात आलं.
सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश
सोनू सूदला न्यायालयात हजर राहण्यासाठी अनेकदा समन्स बजावण्यात आलं. पण, अनेक वेळा समन्स पाठवूनसुद्धा सोनू सूद एकदाही साक्ष देण्यासाठी न्यायालयात पोहोचला नाही. हे लक्षात घेऊन न्यायालयानं आता सोनूविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलीस स्टेशनला पाठवलेल्या वॉरंटमध्ये सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे की, "सोनू सूदला समन्स किंवा वॉरंट रीतसर बजावण्यात आलं आहे. परंतु तो न्यायालयात हजर राहण्यात अयशस्वी झाला आहे (समन्स किंवा वॉरंटची बजवणी टाळण्याच्या उद्देशानं फरार झाला आहे आणि पळून गेला आहे). तुम्हाला सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात येत आहेत."
आदेशात पुढे म्हटले आहे की, "तुम्हाला हे वॉरंट 10-02-2025 रोजी किंवा त्यापूर्वी परत करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत, ज्यामध्ये ते कोणत्या तारखेला आणि कोणत्या पद्धतीने अंमलात आणले गेले आहे किंवा ते का अंमलात आणले गेले नाही याची पुष्टी करणारा पृष्ठांकन असेल."
10 फेब्रुवारीला प्रकरणावर सुनावणी
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होईल. सध्या या प्रकरणात सोनू सूद किंवा त्यांच्या टीमकडून कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही. सोनू सूदच्या प्रोफेशनल फ्रंटबाबत बोलायचं झालं तर, सोनू सूद नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फतेह' मध्ये दिसून आला. पण, अपेक्षेप्रमाणे हा चित्रपच बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
बच्चन कुटुंबाची सून, जिनं जेलमध्ये घालवलीत दोन वर्ष; आता हिट सीरिजमध्ये साकारलीय पोलिसांची भूमिका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

