Anant Kalse On Shiv Sena : ठाकरेंचे 6 खासदार शिंदे गटात जाणार? पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो?
Anant Kalse On Shiv Sena : ठाकरेंचे 6 खासदार शिंदे गटात जाणार? पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो?
ऑपरेशन टायगर अंतर्गत जर ठाकरे गटाचे 6 खासदार फुटून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले तर सध्याच्या परिस्थितीत कायद्यानं त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. कारण निवडणूक आयोगाचा निकाल स्पष्ट आहे. आणि येत्या काळात खासदारांपाठोपाठ आमदारही त्या वाटेवर गेले तर राज्यात अधिक भक्कम सरकार येईल. ज्याचा परिणाम मुंबई महापालिकेसह येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांवर होईल.
हे ही वाचा..
विष्णू चाटे याच्या मोबाईल मध्ये मोठे पुरावे आहेत. ते नष्ट करण्यासाठीच मोबाईल गायब करण्याचे षडयंत्र आहे. केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही: पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का? असा सवाल करत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी केली आहे. विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या. असं ते म्हणाले आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नसल्याच्या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. परंतु केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही. तर त्या मोबाईल मध्ये असलेले पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का? असा सवाल उपस्थित करत धनंजय देशमुख यांनी मोबाईलच्या शोधासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या आणि मोबाईल शोधून काढा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केलीय.. संतोष देशमुख यांची हत्या होऊन 58 दिवस झाले तरी अद्याप पोलीस यंत्रणेला सीआयडीला सापडलेला नाही. यामुळे या मोबाईल मध्ये नेमके काय होते? असा प्रश्न कायम असून त्याचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा या सर्व आरोपींची रिमांड घ्यावे अशीच मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे आज देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यातच असून ते या प्रकरणावर काही भाष्य करतात का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..





















