एक्स्प्लोर

खादाडखाऊ : हायवेवरचे मैत्र 

परवाच एका कामानिमित्त खोपोलीजवळ जाऊन आलो. आजकाल परतताना एक्सप्रेसवे वरुन आपण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कधी पोचतो ते समजतही नाही. तशी त्या वाचलेल्या वेळाची कमी, उजव्या लेनमधून पुढे घुसणारे प्रायव्हेट बसवाले, ट्रक्स भरुन काढतातच म्हणा. हातातल्या घड्याळाकडे पाहिलं, उन्हं नुकतीच उतरली होती. पावसाचीही फार लक्षणं दिसत नव्हती. मग मनातल्या जुन्या भटक्याला जुन्या दोस्तासमान असलेल्या हायवेची आस लागली. घाट पुरता चढून होतो न होतो तोवर मागे पडणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या उष्मदमट हवेला अलविदा करुन खंडाळ्याच्या गार झुळूकींनी मन प्रसन्न केलं. आणि अमृतांजन पॉईंटच्या पुढे आल्यावर घाटातल्या बोगद्यांनी “पुराने दिन याद दिला दिये”! जुन्या बोगद्यातून बाहेर आल्यावर कैक वर्षांनी तिथे रेंगाळलो. पुर्वी ह्याचजागी हायवेवरच्या ट्रकचालकांच्या चहाची तल्लफ भागवायला काही चहा-कॉफीचे ठेले असायचे.नेहमी येण्याजाण्यामुळे त्यातला माझ्याच वयाचा कुंदन नावाचा एक ‘चायवाला’ अस्मादिकांचा दोस्त झाला होता. उमेदवारीच्या दिवसात रात्रीला मित्रांच्या गाडीने, कोणी नाही भेटले तर स्वतःच्या दुचाकीवर फक्त चहा प्यायला येण्याच्या मनातल्या आठवणी दाटून आल्या. दिवसभर रगडून काम झालेलं असायचं, घरी जाऊन दुसऱ्या दिवशी लवकर उठायची घाई नसायची. संध्याकाळी पुण्यातून येताना देहूरोड फाट्याच्या ‘पंजाब स्नॅक्स’च्या अंकलकडे दुधातल्या चहाचा 'वड्डावाला गिलास' रिचवून आमची स्वारी दुचाकीने लोणावळ्यात पोचायची. दुपारपासून भुकेल्या पोटाला घाईने खालेल्या 'गुलिस्तान'मधल्या अंडा आम्लेट आणि तव्यावर शेकलेल्या पावांनी धीर यायचा. पुढे गाडीला खंडाळ्यात पोचायची आस लागायची. मग आमची स्वारी तिला टाच मारुन खंडाळ्याकडे कूच करायची. वाघदरीवरुन सुरु होणाऱ्या घाटाची उतरण अर्धवट ठेवून डावीकडे वळत बोगद्यातून परत येताना कुंदनकडे थांबून एक कटिंग चाय प्यायचा. त्याच्या टपरीवर थांबून त्याला जरा मदत करायची. मधूनच गर्दी नसेल तेव्हा रात्रीच्या काळोखात दिसणारी वाघदरी न्याहाळत, कुंदनला पुण्याच्या, कॉलेजच्या गोष्टी सांगायच्या. तो भक्तीभावाने सगळं ऐकत असायचा. मग आपण त्याच्या निरागस प्रश्नांची मस्करी करायची, वर त्यालाच टाळ्या देत हसायचं. त्याने स्वतःकरता ठेवलेली एखादी मोठी खारी, नानकटाई आपल्याला “अब्बे,थोडा तो खाले बे!” करुन प्रेमाने द्यायची. मग तो नको म्हणत असताना अजून एक दहा रुपयांची नोट फळकुटावर ठेवून, गाडीला किक मारत त्याला पाठमोराच बाय करत पुण्याची वाट धरायची. गप्पा मारत उशीर झालेला असायचा. थंडगार वाऱ्यामुळे पोटात एव्हाना पुन्हा भुकेचा आगडोंब उसळलेला असायचा, खिशात थोडेफार पैसे असायचे. वडगाव मावळच्या अप्सरा हॉटेल ऊर्फ बबी दा धाब्यावर थांबायचो. येताना उजवीकडे आहे ते जुने, डावीकडचे आहे ते नंतरचे साधारण 2000 साली सुरु झालेले. मालक सरदार बडेभाईकडून,“ओय काक्के,कित्थे हो? स्साले भाईका पता भूल गयां?", म्हणत स्वागत व्हायचं. त्यांची गळाभेट घेत ख्यालीखुशाली विचारुन झाल्यावर अंगणातल्या खाटेवर डेरा जमवायचा. कोपऱ्यातला तंदूर भडकलेला असायचा पण बहुतेकवेळा खिशातल्या बजेटचं भान राखून मेन्युकार्डवर नसलेली "मसालोवाली दाल" आणि रोट्या मागवून सुरुवात व्हायची. ‘मसालोवाली दाल’ हा पंजाबी धाब्यावरचा एक साधासोपाच पण अफलातून प्रकार आहे. चाकावरचं जगणं असणाऱ्या ट्रकवाल्यांचे आवडीचं खाणे. कढत तव्यावर माफक तेलावर, हाताला लागतील त्या डाळी परतताना त्यात पंजाबी मसाले टाकले जातात, एकीकडे परतणं सुरुच असतं. त्या खमंग डाळीवर, उस्तादाच्या तबीयतीप्रमाणे तिखट पडलं की होते ती म्हणजे माझी ‘मसालेवाली दाल’.‘माझी’ म्हणायचं कारणही गंमतीदार आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा हा प्रकार खाल्ला होता सुरतजवळ प्रवास करत असताना एका हरयाणवी चौधरीच्या धाब्यावर. त्यात काय होतं ते त्यावेळी अस्मादिकांच्या मतीला काही केल्या समजेना. मग त्यावर स्वतःचे अंदाज करत मी त्याची ट्रायल प्रत्येक धाब्यावर घेत गेलो. दाल फ्राय तशी प्रत्येकच धाब्यावर मिळते, पण त्यात स्वतःची भर घालत एक अजब प्रकार बनायचा आणि विशेष म्हणजे जमून यायचा. त्या हरयाणवी ताऊ त्याला ‘दाल फ्राय’च म्हणत होता. पण त्यावेळी मार्केटिंग नवीन शिकणाऱ्या अस्मादिकांनी त्याला त्या पदार्थाचं नाव बदलायची मार्केटिंगची टीप फुकटात दिली आणि जागच्याजागी त्या डाळीचे नामकरण आम्ही ‘मसालेवाली दाल’ केलं. त्यानंतर कुठल्याही धाब्यावर गेल्यावर तिथला उस्ताद चाणाक्ष नजरेनी हेरुन त्याला ती दाल आपली रेसिपी सांगून बनवून घ्यायचा मला चस्काच लागला होता. अश्या रेसिपी बघितल्याचा, येत असल्याचा फायदा खूप व्हायचा. पहिली म्हणजे आपल्याला डायरेक्ट किचनच्या जवळ इंट्री मिळून जायची, वरती सोबतीच्या यार दोस्तात “ह्या नाऱ्याची ना, जाईल तिथे ओळख” छाप कॉलर टाईट व्हायची. उस्तादाशी एकदा खास ‘जाण्पेहचाण’ झाली कि जेवणाबरोबर गाजर, काकड्या तर अश्याच कॉप्लीमेंट्री मिळून जायच्या. काहीवेळा तर नवीन रेसिपी शिकवण्याच्या बदल्यात दिलदार धाबेवाले ‘मसालोवाली दाल’चेही पैसेही घ्यायचे नाहीत. किंवा माझ्या आवडीची गिलास भर के लस्सी, तरी घ्यायलाच लावायचे. आमच्या बडेभाईचं गिऱ्हाईकांच्या गर्दीतही आमच्याकडे मधूनच लक्ष जायचं. मग कधी ‘करारे चन्या’ची एखादी प्लेट, कधी छोले, त्याच्यासोबत स्पेशल मखमली कुलचे न मागवता समोर यायचे. भुखे शेर त्यावरही आडवा हात मारायचे. निरोप घेताना,“भाईसाब चलें?”विचारताना पोट आणि मन दोन्ही भरलेलं असायचं. वर्ष जातात, तिकडे आपलं जाणं काही कारण नसताना अगदी उगाचच बंद होतं. मग कधीतरी तो कुंदन एक्स्प्रेसवेनंतर टपऱ्या हटवल्यामुळे मुंबईला गेल्याचे समजते. गेल्यावर घराच्या वरताण अगत्य दाखवणारे, ओय..आ गया काक्के!ची प्रेमळ साद देणारे भाईसाबही आता ह्या जगात नाहीत, अशी बातमी मिळते. पण मनात त्यांची निर्हेतुक मैत्री घर करुन राहते. कोण कुठला तो बरेलीचा कुंदन आणि कोण ते सरदार भाईसाब? कुठून येतात इकडे? पैशांकडे न बघता गिऱ्हाईकांना घरचे समजून खायला प्यायला घालतात? का ऋणानुबंध जुळतो माझा, त्यांचा? परवा कामशेत क्रॉस केल्यावर जाणूनबुजून माझी नजर डावीकडेच ठेवली. न जाणो त्या ‘बबी दा धाब्याकडे’ बघताना माझा आठवणींचा हुंदका कदाचित आवरला नसता.

खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग:

खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा

ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’! खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget