Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
Saif Ali Khan Attacked Case: सैफ अली खानला भोसकणाऱ्या आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर विचित्र परिस्थिती निर्माण झाली. एकतर हायप्रोफाईल केस आणि त्यात आरोपीचं वकीलपत्र घेतलेले दोन वकील आपापसांत भिडल्यामुळे कोर्टात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
Saif Ali Khan Attacked Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या (Bollywood Actor Saif Ali Khan) घरात घुसून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी (Saif Ali Khan Seriously Injured) झालेला. याप्रकरणातील आरोपी तब्बल तीन दिवसांनी पोलिसांच्या ताब्यात सापडला. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी रविवारी त्याला वांद्रे कोर्टात (Bandra Court) हजर केलं. पण, आरोपीला हजर केल्यानंतर कोर्टात मात्र, वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आरोपीचं वकीलपत्र घेतलेले दोन वकील आपापसांत एकमेकांना भिडेले. त्यावेळी कोर्टात एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती
सैफ अली खानला भोसकणाऱ्या आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर विचित्र परिस्थिती निर्माण झाली. एकतर हायप्रोफाईल केस आणि त्यात आरोपीचं वकीलपत्र घेतलेले दोन वकील आपापसांत भिडल्यामुळे कोर्टात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आरोपीला ज्या दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं होतं, त्या दंडाधिकाऱ्यांना थेट वकीलांचं भांडण सोडवण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला होता. दंडाधिकाऱ्यांनी दोन्ही वकिलांना आरोपीची बाजू एकत्रितपणे मांडण्याची सूचना केली. त्यानंतर वाद निवळला आणि सुनावणी पार पडली.
सैफचा हल्लेखोर कोण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा एक बांगलादेशी नागरिक आहे, त्याला ठाण्याहून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकून वार केलेत. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला.
रविवारी मोहम्मद शहजादला मोठ्या पोलिस बंदोबस्तात वांद्रे येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर आरोपीला मागच्या बाजूनं कचेरीत नेण्यात आलं. तेवढ्यात एक वकील आरोपींचं प्रतिनिधित्व करणार असल्याचा दावा करत पुढे आला.
कोर्टात हायव्होल्टेज ड्रामा, दोन वकील आपापसांत भिडले
आरोपीनं वकीलपत्रावर सही करण्यापूर्वीच, कोर्टरुममध्ये नाट्यमय वळण आलं, जेव्हा दुसऱ्या वकिल आरोपीजवळ गेला आणि त्याची सही घेऊन मी खटला लढणार असल्याचा दावा केला. त्यामुळे कोर्टात नेमकं आरोपीचं वकीलपत्र कुणी घेतलं? आणि त्याच्या वतीनं कोर्टात केस कोण लढणार? याबाबत गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर वातावरण शांत करण्यासाठी दंडाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही वकिलांना एकत्रितपणे आरोपीची बाजू मांडण्याचं सुचवलं. मजिस्ट्रेटनं म्हटलं की, "तुम्ही दोघेही हजर राहू शकता..." आणि वाद निवळला आणि कोर्टाची कार्यवाही सुरू झाली. दोन्ही वकिलांनी मजिस्ट्रेटनं सुचवलेल्या निर्णयावर सहमती दर्शवली. यानंतर न्यायालयानं आरोपी शहजादला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, आरोपीला अटक करण्यापूर्वी, पोलिसांनी अभिनेता सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे त्याच्यासारख्या दिसणाऱ्या अनेक लोकांना ताब्यात घेतलं होतं. अखेर तीन दिवसांनी खरा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
पाहा व्हिडीओ : Saif Attacke Kidnap Jahangir : सैफचा लेक जहांगीरला ओलीस ठेऊन पैशांची मागणी करण्याचा आरोपीचा कट
महत्त्वाच्या इतर बातम्या :
वन टू वन फाईटमध्ये मॅचोमॅन सैफ अली खानला मोहम्मद शहजाद कसा भारी पडला? बांगलादेशात खेळायचा कुस्ती