Buldhana News : विनापरवाना किटकनाशकांची विक्री, कृषी विभागाची बुलढाण्यातील कृषी केंद्रावर करावाई, 5 लाख 83 हजारांची खते जप्त
विनापरवाना किटकनाशकांची विक्री (Sale of pesticides) करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील कृषी केंद्रावर कृषी विभागानं (Department of Agriculture) कारवाई केली आहे.
Buldhana News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात विनापरवाना किटकनाशकांची विक्री (Sale of pesticides) करणाऱ्या कृषी केंद्रावर कृषी विभागानं (Department of Agriculture) कारवाई केली आहे. जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथील कृषी केंद्रावर कृषी विभागानं छापा टाकून 5 लाख 83 हजारांची किटकनाशके आणि रासायनिक खते जप्त केली आहेत. कृषी विभागाच्या भरारी पथकाला याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे भरारी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. साईरामा हार्डवेअरवर असे या कृषी केंद्राचे नाव आहे.
मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी इथे विनापरवाना किटकनाशकांची आणि रासायनिक खतांची विक्री होत होती. याबाबतची माहिती रोपनिय माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कृषी विभागानं ही कारवाई केली. विनापरवाना आणि अवैधरित्या किटकनाशकांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळं दुकान मालक रोशन गजानन पाटील यांच्याविरुद्ध धामणगाव बढे पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. आहे.
दरम्यान, साईरामा हार्डवेअर या दुकानातून 5 लाख 83 हजारांची किटकनाशके आणि रासायनिक खते जप्त केली आहेत. यावेळी कृषी अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. शेतकऱ्यांनी फसवणूक टालण्यासाठी किटकनाशके, बियाणे आणि खते अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्राकडूनच खरेदी करावी. तसेच ही खरेदी झाल्यानंतर त्याची पावती देखील घ्यावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस झाला आहे. नेक पिकांसाठी हा पाऊस वरदान ठरला आहे. पावसामुळं शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. सध्या शेतीकामांना वेग आला आहे. खते, बियाणे, किटकनाशकांची शेतकरी मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत आहेत. मात्र, ही खरेदी करताना शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. जेणेकरुन कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. सध्या बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र, पिक अधिक जोमानं येण्यासाठी शेतकरी खतांची, किटकनाशकांची खरेदी करताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: