बाळासाहेब आजबेंनी सुरेश धसांविरोधात थोपटले दंड, धसांच्या विरोधात करणार उपोषण, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटणार
बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजप (BJP) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (Ajit Pawar Group) यांचा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. अ

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजप (BJP) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (Ajit Pawar Group) यांचा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Ajbe) यांनी आज पत्रकार परिषद घेत सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. बाळासाहेब आजबे हे सुरेश धस आणि प्रशासन यांच्या विरोधात आजपासून उपोषण करणार आहेत.
बाळासाहेब आजबे हे सुरेश धस यांच्यापूर्वी अजित पवार गटाचे आष्टी मतदारसंघाचे आमदार होते. मात्र 2024 च्या निवडणुकीत सुरेश धस यांनी आजबेंना पराभूत केले. दरम्यान मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा निधी रोखून धरल्याने बाळासाहेब आजबे हे आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बेमुदत उपोषण करणार आहेत. दरम्यान या उपोषणाच्या माध्यमातून आष्टी मतदारसंघात भाजपा आणि अजित पवार गटातील संघर्ष पेटणार आहे.
दोन महिन्यापासून आष्टी मतदार संघातील कामं ठप्प
दोन महिन्यापासून आष्टी मतदार संघातील कामं ठप्प आहेत. अधिकाऱ्यांना देखील याबाबत सांगितले आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. त्यांनी वेळ मागितला आहे. सुरेश धस यांच्याकडून हे सर्व सांगितले जात आहे. धस यांना फोन केला होता, विकास कामे थांबवू नका. गावातील विकास कामे थांबवली आहेत. या संदर्भात अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. आष्टी पाटोदा आणि शिरूर येथील कामं थांबवली आहेत, असे आजबे म्हणाले. जमावबंदी लागू असल्यानं आम्ही उपोषणाला बसलो नाही. याबाबत अजित पवार यांना सांगितले आहे. या (धस) माणसाचे आडमुठे धोरण आहे. मतदारसंघात त्यांचे लक्ष नाही. मीडियामुळे ते आम्हाला जड झाले आहेत. त्यांच्याकडे किती अंधार हे पाहायला पाहिजे. ज्याच्यावर अन्याय झाला ती माणसं मी इथे आणली आहेत असे आजबे म्हणाले.
सुरेश धस आणि वाल्मीक कराड यांचे 20 वर्षांपासूनचे संबंध
सुरेश धस आणि वाल्मीक कराड यांचे 20 वर्षांपासूनचे संबंध आहेत. हे फक्त मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखे कर असा प्रकार सुरु असल्याचा आरोप बाळासाहेब आजबेंनी केला. समाजातील लोकांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. यांचे खूप दिवसापासूनचे संबंध आहेत. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आमच्या मंत्र्यांवर आरोप केले जात आहेत, हे सिद्ध झाले पाहिजेत. धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा असेही आजबे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Suresh Dhas Meet Santosh Deshmukh Family: धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर सुरेध धस पहिल्यांदाच मस्साजोगात पोहचले; धनंजय देशमुख म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
