एक्स्प्लोर

Pune Swargate Assault: नागपूरचा वसुली अधिकारी पुण्यात नेऊन बसवला, दुसरं काय होणार, स्वारगेट प्रकरणावरुन विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप

Pune Swargate Assault: नागपूरचा वसुली अधिकारी तिकडे पुण्यात नेऊन बसवला त्यामुळेच या महिलांवर अत्याचाराच्या घटनात वाढ होत आहे, असा आरोप देखील विजय वडेट्टीवारांनी केला आहे.

पुणे: पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर पुण्यासह राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमकपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणात त्यांनी राज्य सरकारसह, पुण्याच्या पोलिस प्रशासनासह पोलिस आयुक्तांनाही धारेवर धरलं आहे. तर अप्रत्यक्षपणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नागपूरचा वसुली अधिकारी तिकडे पुण्यात नेऊन बसवला त्यामुळेच या महिलांवर अत्याचाराच्या घटनात वाढ होत आहे, असा आरोप देखील  विजय वडेट्टीवारांनी केला आहे. 

घटनेची जबाबदारी सरकार आणि एसटीने स्वीकारली पाहिजे

स्वारगेट बस डेपोमध्ये झालेली घटनेची जबाबदारी सरकार आणि एसटीने स्वीकारली पाहिजे, कारण घटना घडली तेव्हा तिथे असलेली यंत्रणा काय करत होती. रिकाम्या बसमध्ये जे साहित्य मिळाले आहे ते धक्कादायक आहे. त्या ठिकाणी चार रिकाम्या बस महिलांच्या शोषणसाठी वापरल्या जात होत्या का? असा प्रश्न निर्माण होतो. त्या ठिकाणी वीस सेक्युरिटी गार्ड काय करत होते. गृह विभागाची इभ्रत रोज चालली आहे, ती वेशीवर टाकल्यासारखी स्थिती झाली आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. आमच्या सरकारने शक्ती कायदा संदर्भातली तयारी केली होती. मात्र, आमचा सरकार गेलं, नवीन सरकारने कायदा तयार करण्याची गरज होती. मात्र तसं झालेलं नाही. यांना महिला सुरक्षेची अजिबात चिंता नसून हे सत्तेत मशगुल झाले आहे. स्वारगेटच्या घटने संदर्भातले मुद्दे आम्ही विधानसभा अधिवेशनात उचलू. गृह विभागाचा आणि कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो, असंही पुढे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

मुलींच्या बाबतीत अत्यंत धोक्याचं शहर

पुणे शिक्षणाचा माहेरघर, सांस्कृतिक नगरी असली, तरी मुलींच्या बाबतीत अत्यंत धोक्याचं शहर झाला आहे. महाराष्ट्र शक्ती कायद्याची कठोर अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा ही सरकारकडून अपेक्षा असताना तसं दिसत नाही. शैक्षणिक नगरीमध्ये मुली सुरक्षित नाही, तर तिथला पोलीस कमिशनर काय करत आहे? चॉकलेट खाऊन बसले आहे का? ते हप्ते वसुलीसाठी आहे का?? नागपुरातला वसुली अधिकारी (पुणे पोलीस आयुक्त) पुण्यात नेऊन बसवला आणि तिथे वसुली सुरू झाली आणि त्यामुळे पुण्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहे असा माझा आरोप आहे, असंही वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.

या घटनेची संपूर्ण जबाबदारी सरकारने तिथे असलेल्या यंत्रणेने स्वीकारली पाहिजे. ज्या पद्धतीने तिथे चौकशी केल्यानंतर जे साहित्य मिळालं आहे. यावरून स्टार बसचा वापर महिला शोषणसाठी होत होता का? त्यासाठी त्या बस तिथे ठेवल्या होत्या का? असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. 23 सेक्युरिटी गार्ड असल्यावरही महिलेवर बलात्कार होतो. गृह खात्याची रोजच इब्रत वेशीवर टाकल्याची परिस्थिती आहे. या सगळ्या घटनेवरून महाराष्ट्रात कायदा व सविस्तर नसल्याची दिसून येत आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. सरकार या घटनांवर गंभीर आहे की नाही? हा प्रश्न उपस्थित होतो. फक्त म्हणतायेत की आम्ही कारवाई करू.आम्ही अटक करू परंतु ते काही करत नाही महिलांच्या शोषणामध्ये वाढ होत चालली आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. 

सत्तेतील लोकांशी संबंधित लोक महिलांवर अत्याचार करतात

राज्यामध्ये एकूणच राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहिली तर गुन्हेगारांना अभय दिल्यासारखा वाटत आहे. अशा अनेक घटना आहे. बदलापूर घटनेमध्ये अजूनही ही संस्था चालकावर कारवाई झाली नाही. आरोपीला एककाउंटरमध्ये मारून त्याला अभय देण्याचे काम राज्यामध्ये सुरू आहे. त्यामुळे त्याही आरोपीला जर उद्या अभय मिळालं तर वावग ठरणार नाही. पुण्यात शिक्षणाचा माहेरघर संस्कृतिक नगरी हे विश्लेषण उपयोग होणार नाही, शक्ती कायद्याची कडक अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा ही सरकारकडून अपेक्षा आहे ते दिसत नाही. आतापर्यंतचा रेकॉर्ड पहिला सत्तेमधील असलेल्या लोकांशी संबंधित असलेल्याच लोक महिलांवर अत्याचार करताना दिसत आहेत, असं मोठं वक्तव्य देखील विजय वडेट्टीवारांनी केलं आहे.

सरनाईकांच्या बैठकीवर साधला निशाणा

स्वारगेट परिसरात घडलेल्या घटनेनंतर आज मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक बोलावली आहे, यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेतते विजय वडेट्टीवार म्हणाले, घटना घडल्यावर बैठका नेहमीच बोलावल्या जातात. तलाव फुटून गेला. पाणी निघून गेल्यावर तलाव बांधून हे सगळं झाल्यानंतर बैठक घेऊन उपयोग नाही.

Pune Swargate Assault: योगेश कदम कुठल्या तोंडानं इथं आलेत, आरोपीला घेऊन या, गाडे सरेंडर व्हायची वाट पाहता का? तृप्ती देसाईंंचा मंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Embed widget