एक्स्प्लोर

Team India : तिसऱ्या वन-डे पूर्वी महाकाल देवाच्या दर्शनाला पोहोचले भारतीय क्रिकेटर, ऋषभ पंतसाठीही केली प्रार्थना

Mahakaleshwar Mandir : कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव यांच्यासह वॉशिंग्टन सुंदर असे काही भारतीय क्रिकेटर प्रसिद्ध बाबा महाकालेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले आहेत.

Team India at Mahakaleshwar Mandir : सध्या भारत न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) एकदिवसीय मालिका खेळत असून तिसऱ्या वन-डे पूर्वी भारतीय खेळाडू (Team India) जगप्रसिद्ध अशा बाबा महाकालेश्वरच्या मंदिरात पोहोचले आहेत. यावेळी सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि भारतीय क्रिकेट संघाशी संबधित काही कर्मचारी दिसून येत आहेत. भारतीय खेळाडूंनी बाबा महाकालची दिव्य अलौकिक भस्म आरतीला देखील यावेळी हजेरी लावली. याशिवाय बाबा महाकाल यांची विधिवत पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. खासकरुन सहकारी क्रिकेटर ऋषभ पंतची (Rishabh Pant) प्रकृती लवकर ठीक होवो अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर ओम नमः शिवाय चा जप करताना दिसत आहेत. याशिवाय सूर्यकुमार यादव याने खासदार अनिल फिरोजिया यांच्याशी चर्चा केल्याचंही दिसून येत आहे. भारतीय क्रिकेटपटू पारंपरिक पोशाखात दिसत असू त्यांची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडल्याचं दिसत आहे. चाहते सतत सोशल मीडियावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. ANI वृत्तसंस्थेने खेळाडूंचे दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून हे सर्व फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सूर्यकुमार यादवने ऋषभ पंतसाठी मागितला नवस...

सूर्यकुमार यादव याने यावेळी पत्रकारांशी संवाद साधला असताना यावेळी त्याने बाबा महाकाल यांच्या दिव्य अलौकिक भस्म आरतीमध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याचे सांगितले. यादरम्यान मी बाबा महाकाल यांना सांगितले की माझा प्रिय मित्र आणि सहकारी क्रिकेटपटू ऋषभ पंत लवकर बरा व्हावा' अशी प्रार्थना मागितल्याचंही सूर्यकुमारनं सांगितलं. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवसाठी 2022 हे वर्ष कमालीचे यशस्वीचे ठरलं. त्याला ICC T20 टीम ऑफ द इयरमध्ये देखील आजचं स्थान मिळालं आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 3 वेळा शतकाचा टप्पा ओलांडला होता. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवपेक्षा फक्त रोहित शर्मानेच जास्त शतकं आता झळकावली आहेत.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Beed: मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
Old kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare :'डॉ. Neelam Gorhe मातोश्रीवर पडीक असायच्या, सर्वात जास्त कमाई त्यांनीच केली असावी'Ambadas Danve On Neelam Gorhe : ही नीलम गोऱ्हेंची नमकहरामी, आरोपानंतर दानवेंची सडकून टीकाNeelam Gorhe on Uddhav Thackeray : दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद, गोऱ्हेंचा ठाकरेंवर आरोप!Budget Session : 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 10 मार्चला अजित पवार मांडणार अर्थसंकल्प

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Beed: मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
Old kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
Bacchu Kadu: ...तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
....तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
Nashik Crime : सोनाराच्या दुकानात तिघांकडून दिवसाढवळ्या दरोडा, टोळीचा म्होरक्या हरियाणात लपल्याची टीप, नाशिक पोलिसांचे पथक पोहोचले अन्...
सोनाराच्या दुकानात तिघांकडून दिवसाढवळ्या दरोडा, टोळीचा म्होरक्या हरियाणात लपल्याची टीप, नाशिक पोलिसांचे पथक पोहोचले अन्...
Shashi Tharoor on Congress : जिथं अज्ञानात आनंद मिळतो, तिथं शहाणपणा दाखवणं मूर्खपणाचं लक्षण! काँग्रेस आणि शशी थरुरांमध्ये चाललंय तरी काय?
जिथं अज्ञानात आनंद मिळतो, तिथं शहाणपणा दाखवणं मूर्खपणाचं लक्षण! काँग्रेस आणि शशी थरुरांमध्ये चाललंय तरी काय?
Jitendra Awhad : सुनील केदार, राहुल गांधींना एक न्याय, सत्ताधारी माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का? जितेंद्र आव्हाड आक्रमक
सुनील केदार, राहुल गांधींना एक न्याय, सत्ताधारी माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का? जितेंद्र आव्हाड आक्रमक
Embed widget