एक्स्प्लोर

IND vs NZ : इंदूरमध्ये भारताचा दबदबा, न्यूझीलंडचा विजय अवघड, हे मोठे वन-डे रेकॉर्ड माहित आहेत का?

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना इंदूरच्या मैदानात खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने आजवर या मैदानात एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही.

India records at Holkar Cricket Stadium Indore : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु वनडे मालिकेतील शेवटचा सामना उद्या अर्थात 24 जानेवारी रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. एकदिवसीय मालिकेत भारताने आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा उडवण्याची संधी आहे. विशेष म्हणजे इंदूरमधील भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील आजवरचा फॉर्म दमदार आहे. ज्यामुळे न्यूझीलंडचं अखेरचा सामना जिंकणं तसं अवघड आहे. 

त्यात यंदाच्या वर्षभरात सलग पाच एकदिवसीय सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाचा उत्साह देखील उंचावला आहे. न्यूझीलंड संघ पहिल्यांदाच इंदूरच्या होळकर स्टेडियमवर एकदिवसीय सामना खेळणार आहे. तर भारताने आजवर एकही सामना या ठिकाणी गमावलेला नाही. तर इंदूरमधील या सामन्यापूर्वी भारताच्या याठिकाणच्या काही मोठ्या वनडे रेकॉर्डबद्दल जाणून घेऊ... 

  1. सर्वोच्च धावसंख्या - भारत 418/5 वि. वेस्ट इंडीज
  2. वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या - वीरेंद्र सेहवाग, वि. वेस्ट इंडिज 
  3. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी - एस श्रीशांत, 6 विकेट्स वि. इंग्लंड 

भारत इंदूरच्या मैदानात अजय

इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये भारताचाच दबदबा आजवर राहिला आहे. वनडेमध्ये भारतीय संघ आतापर्यंत एकही सामना हरलेला आहे. भारताने इंदूरमध्ये 5 पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारताने विजयाची नोंद केली आहे. इंदूर येथे पहिला एकदिवसीय सामना 15 एप्रिल 2006 रोजी खेळला गेला. त्यात भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. त्यानंतर पुढील चार सामन्यांत सलग विजय नोंदवण्यात टीम इंडियाला यश आलं आहे. या मैदानावर भारताने आतापर्यंत इंग्लंडला दोनदा तर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना प्रत्येकी एकदा पराभूत केलं आहे. न्यूझीलंडचा संघ इंदूरमध्ये प्रथमच एकदिवसीय सामना खेळणार आहे.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
Hardik Pandya and Arshdeep Singh Trade: मोठी बातमी : IPL मध्ये सर्वात मोठा उलटफेर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर, तर अर्शदीप सिंगची एन्ट्री!
मोठी बातमी : IPL मध्ये सर्वात मोठा उलटफेर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर, तर अर्शदीप सिंगची एन्ट्री!
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
Aaryavir Sehwag Century : पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण 'करो या मरो' सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक
पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण 'करो या मरो' सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Embed widget