Rupali Chakankar on Purnangini : विधवा नाही पूर्णांगीनी म्हणा, महिला आयोगाची राज्य सरकारकडे शिफारस
Rupali Chakankar on Purnangini : विधवा नाही पूर्णांगीनी म्हणा, महिला आयोगाची राज्य सरकारकडे शिफारस
पतीच्या निधनानंतर त्या महिलेचा विधवा असा उल्लेख न करता तिला पूर्णांगिनी असं संबोधण्याची शिफारस राज्य महिला आयोगाकडून राज्य शासनाला करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात दिली. राज्य महिला आयोगाच्या वतीनं जागर स्त्रीत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा या खास कार्यक्रमाचं वांद्र्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रांवर आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. एखाद्या महिलेच्या पतीच्या निधनानंतर तिचा विधवा असा करण्यात येणारा उल्लेख हा अपमानकारक वाटतो. त्यामुळं पतीच्या निधनानंतर त्या महिलेला पूर्णांगिनी असं संबोधण्याची शिफारस राज्य सरकारला करण्यात आल्याची माहिती रुपाली चाकणकरांनी दिली.