Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल
Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल
बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे..मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय...
भाजप आमदार सुरेश धस, मनोज जरांगे यांच्यासह स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुखही मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.. सकाळी ११ वाजता मोतीबाग येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथुन या मोर्चाला सुरवात होईल ...
बीड हत्याप्रकरणात सर्व आरोपींना अटक करा या मागणीसाठी आज जालन्यात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.. या मोर्चासाठी देशमुख कुटुंबिय जालन्यात दाखल झालेत..
दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करा अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिलेली मुदत उद्या संपणार आहे,..मस्साजोगचे ग्रामस्थ उद्या ठराव घेऊन आंदोलन करणार आहे.,. हे आंदोलन शांततेत करणार असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिलीय.