एक्स्प्लोर

ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..

Dyanradha MultistateFraud Update:सुरेश कुटे आणि त्याच्या पत्नी अर्चना कुटे यांनी मल्टीस्टेटच्या माध्यमातून 4 लाखांहून अधिक ठेवीदारांकडून जवळपास 2470 कोटी रुपये गोळा केले.

Dyanradha Multistate Fraud Update: मराठवाड्यात लाखो ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे ईडीने सुरेश कुटेची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 1433 कोटी 48 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. सुरेश कुटे आणि त्याच्या पत्नी अर्चना कुटे यांनी मल्टीस्टेटच्या माध्यमातून 4 लाखांहून अधिक ठेवीदारांकडून जवळपास 2470 कोटी रुपये गोळा केले. ठेवीदारांना 12-14% व्याजदराचा परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या ठेवींचा अपहार करत कुटे ग्रुपच्या विविध कंपन्यांना फसव्या कर्जांच्या स्वरूपात रक्कम वाटप करण्यात आली.

कुटे ग्रुपने या रकमेचा गैरवापर केला आणि अनेक बँक खात्यांतून थेट पैसे काढून घेतल्याचं ईडीच्या तपासात समोर आले आहे . कुटे आणि कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेला असून एमपीआयडी कायद्यांतर्गत मे ते जुलै 2024 दरम्यान विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. ठेवीदारांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतलेल्या या प्रकरणामुळे मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. फसवणूक झालेल्या ठेवीदारांना न्याय मिळावा, यासाठी ईडीचा तपास अद्याप सुरू आहे. ईडीने 9 जानेवारी रोजी जाहीर केलेल्या पत्रकात या कारवाईची माहिती दिली. या प्रकरणावर पुढील कायदेशीर पाऊल कसे उचलले जाईल, याकडे ठेवीदारांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीच ED नेज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात बीड छत्रपती संभाजीनगर, मुंबई पुण्यातील शाखांमधून तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त केली होती. 

राज्याबाहेरही जाळे असल्याची शक्यता

बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर जाळे पसरलेले आहे. गेल्या वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. या मल्टीस्टेट घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार सुरेश कुटे यांची मागील महिन्यात ईडी कडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर व केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयानंतर बीड, छत्रपती संभाजी नगर पुणे व मुंबई या शाखांमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

ईडीकडून एकूण १०२ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीकडून आत्तापर्यंत एकूण 102 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून या चारही शाखांमधून जवळपास 95 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये या चारही शाखांमधील फ्लॅट, व्यावसायिक कार्यालय, प्लॉट अशी 85 कोटी 88 लाख रुपये किमतीची स्थावर मालमत्ता तसेच इतर मालमत्ता असे एकूण 95 कोटी एक लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संस्थापक सुरेश कुठे व इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रींगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Embed widget