Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये आरोपी गोळी झाडल्यानंतर पळताना दिसत आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अमृतसर : पंजाबमधील अमृतसरमध्ये सराफ दुकानकाराची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. मित्रानेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. मित्र दुकानात त्याचा मुलगा, भावजय आणि कुटुंबीयांसह पैशाच्या व्यवहारासाठी आला होता. यादरम्यान वादावादी झाली. यानंतर आरोपी घरी जाऊन पिस्तुल घेऊन आला. त्याने पुन्हा वाद घातला आणि रस्त्यावर येऊन सराफ दुकानदारावर गोळ्या झाडल्या. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सिमरनपाल सिंग असे मृताचे नाव आहे.
जसदीप सिंग चन्न आणि सिमरनपाल सिंग दोघे मित्र
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये आरोपी गोळी झाडल्यानंतर पळताना दिसत आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसदीप सिंग चन्न आणि सिमरनपाल सिंग हे दोघे मित्र होते. दोघेही सोनाराचे काम करायचे. त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे होते. सिमरनपाल सिंग यांचे ताहलीवाला मार्केटमध्ये जयपाल ज्वेलर्सच्या नावाने दुकान आहे. शुक्रवारी दुपारी जसदीप सिंग आपल्या मुलासह कुटुंबासह सिमरनपाल सिंग यांच्या दुकानात व्यवहारासाठी गेले होते. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. प्रकरण वाढल्यानंतर जसदीप सिंग तेथून निघून गेला. 3 वाजता तो पुन्हा सिमरनपाल सिंगच्या दुकानात आला आणि त्याच्याशी वाद घालू लागला. वाद घालत दोघेही दुकानाबाहेर रस्त्यावर आले. दरम्यान, जसदीप सिंगने पिस्तूल काढून सिमरनपाल सिंगच्या डोक्यात गोळी झाडली.
*Yesterday Incident*
— Akashdeep Thind (@thind_akashdeep) January 11, 2025
A jeweller was shot dead by another jeweller following a dispute over gold in Tahli wala bazaar area here on Friday. The deceased was identified as Simarpal Singh of Hussainpura Chowk area.
The accused, Jasdeep Singh Chann, was known to the victim, it is… pic.twitter.com/YgGX2JM9u0
आरोपीचा पाठलाग करून पकडण्यात आले
पोलिसांनी पुढे सांगितले की, गोळी सिमरनपाल सिंगच्या डोक्यात लागली आणि ते रस्त्यावर पडले. त्यानंतर एका व्यक्तीने आरोपी जसदीप सिंगला पकडले. सिमरनपाल यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर सर्व दुकानदार घटनास्थळी जमा झाले. त्यांनी दुकाने बंद करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला आणि जवळपास बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. एसपी एचएस रंधवा यांनी सांगितले की, आरोपीने रागाच्या भरात हे पाऊल उचलले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पथकाने पाठलाग करून आरोपीला पकडले. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या