Lok Sabha Parliament Session : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, Rajnath Singh यांचं भाषण
Lok Sabha Parliament Session : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, राजनाथसिंह यांचं भाषण
आजच्या महत्वाच्या बातम्या 13 dec 2024 :
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार, सूत्रांची माहिती,उद्या सकाळी ११ किंवा दुपारी ४ वाजता नव्या सरकारचे नवे मंत्री शपथ घेण्याची शक्यता.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची भाजप केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा, उद्योगपती गौतम अदानींच्या घरी चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती, अजित पवारांसोबत जायचं की थेट भाजपसोबत युती करावी यावरुन दोन मतप्रवाह
दिल्लीत सुरू असलेल्या घडामोडी पाहता कुछ तोे गडबड है, वडेट्टीवारांचं वक्तव्य, तर दिल्लीत अदानींकडे भेटीगाठी नाहीत, शरद पवारांच्या राष्ट्रवादी खासदारांची सारवासारव
बीएमसी जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा निर्धार, कामाला लागा, शिंदेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश, प्रत्येक वॉर्डात फिरून घेणार कामाचा आढावा, महायुती धर्म पाळण्याचा सल्ला
मनपा निवडणुका स्वबळावर लढण्याचे खासदार राऊतांचे संकेत, मविआसोबत लढण्याची अजून चर्चा नाही, राऊतांचं वक्तव्य, तर राऊत निराशेपोटी एकला चलो रे बोलत असावे, वडेट्टीवारांचा टोला