Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी एप्रिलचा पहिला आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 31 March To 06 April 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 31 March To 06 April 2025 : मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याला लवकरच सुरुवात होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होत असल्यामुळे हा आठवडा अनेक राशींसाठी खास असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात शनीच्या संक्रमणामुळे तुमच्यावर साडेसातीचा काहीसा प्रभाव असणार आहे. त्यासाठी कोणत्याही नवीन कार्याला सुरुवात करु नका. तसेच, आर्थिक बाबतीत थोडं सावध राहा. कोणालाही पैसे उधारी देऊ नका. तसेच, कोणावरही अंधपणाने विश्वास ठेवू नका. तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांवर साडेसातीचा कोणताच प्रभाव नसणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी निश्चिंत राहावे. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. कामाचा थोडा ताण वाढलेला जाणवेल. या आठवड्यात तु्म्हाला एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी नवीन आठवडा प्रगतीचा असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात चढ-उतार जाणवू शकतात. मात्र, तुम्ही घेतलेल्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असल्या कारणाने तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. आठवड्याच्या शेवटी तुम्ही धार्मिक स्थळाला देखील भेट देण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायातून ना फायदा जाणवणार तसेच, ना तोटा जाणवणार. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. ग्रहांची स्थिती सामान्य असल्यामुळे कोणतं टेन्शन घेऊ नका. मात्र, वेळोवेळी तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. तब्येतीशी तडजोड करु नका.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार चांगला असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात देखील हळुहळू प्रगती दिसेल. धार्मिक कार्यात तुमची जास्त रुची वाढलेली दिसेल. एकूणच सूर्यदेवाची तुमच्यावर चांगली कृपा असणार आहे. त्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल. तसेच, तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही. तुमच्या कामात चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमचा समाजात मान-सन्मान वाढलेला दिसेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















