आमदार होणं सोपं पण सरपंच होणं एवढं सोपं नाही, जळगावमध्ये गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी
सरपंच किती काम करतो, हे पोस्टरवर नव्हे जमीनीवर दिसला पाहिजे असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil ) यांनी केलं.

Gulabrao Patil : सरपंच किती काम करतो, हे पोस्टरवर नव्हे जमीनीवर दिसला पाहिजे असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil ) यांनी केलं. काही लोक बॅनर लावतात. कार्यक्रमात सरपंच कार्यक्रमाट आणि गावातील गटर ओसंडून वाहते, वा रे वा सरपंच असा टोला देखील पाटील यांनी लगावला. पोस्टरवर लिहील्यापेक्षा 50 टक्के तरी प्रत्यक्षात असले पाहिजे. पाणी पिऊ पिऊन लोक शिव्या देतात, सरपंच होण एवढं सोप नाही, आमदार होणं सोप आहे. आमदाराचे कसं असतं, या गावात मत भेटले नाही तर त्या गावात भेटते असे गुलाबराव पाटील म्हणाले.
मेरे बाप को उसके बापने गिराया था असं असतं, चुन चुन के बदला लेगे, शेत विकून टाकेल पण त्याला पाडूनच टाकेल, अशी मानसिकता सरपंचपदाच्या निवडणुकीत असते असे पाटील म्हणाले. मी भरपूर असे सरपंच पाहिले की त्यांनी भरपूर कामे केली आहेत. मात्र, पुढच्या वेळी विचारलं काय झालं असं विचारले की ते सांगतात, संपूर्ण पॅनल पडलं असे पाटील म्हणाले. मला वाटत ग्रामपातळीवर सुध्दा सामाजिक विचार करण्याची जी मानसिकता आहे, ती बदलली पाहिजे. जो काम करेगा वही राज करेगा, अशी मानसिकता सर्वांमध्ये झाली पाहिजे. त्याशिवाय विकासाचे हे पर्व चालू शकत नाही असे पाटील म्हणाले.
बायको सरपंच झाली तर तिच्या मागे उभा राहा
सध्या लाकक्या बहिणी सरपंच आहेत. नवऱ्यांना माझी विनंती आहे की हात घालू नका. महिलांना थोडं काम करु द्या, तुम्ही थैली घेवून त्यांच्या मागे राहा, तुमचे काम तेच आहे असे गुलाबराव पाटील म्हणाले. बायको तुमची आयुष्यभर सेवा करते, मग ती सरपंच झाली तर तिच्या मागे उभा राहा ना काय फरक पडतो, पतीचे काम हे फक्त प्रॉम्टिंग करायचे आहे असे पाटील म्हणाले.
4 लाख लोकांमधून निवडून येण सोपं पण 1 हजार लोकांमधून 600 मते मिळवणे महाकठीण
ग्रामपंचायत निवडणूक जो जिंकतो तो महामंडलेश्वर असतो. 4 लाख लोकांमधून निवडून येण सोपं आहे, पण 1 हजार लोकांमधून 600 मते मिळवणे महाकठीण आहे असे पाटील म्हणाले. जास्त बोलणं उचित होणार नाही. तुम्ही म्हणाल गुलाबराव पाटील आमदार मंत्री आहेत की किर्तनकार आहे असे पाटील म्हणाले. सरपंच आणि विरोधक एकाच टपरीवर चहा पिले म्हणजे गावाचे कल्याण झाले असे समजा, त्यामुळं विरोधकांना पटवा असे पाटील म्हणाले. आम्ही देखील कॉम्प्रामाईज करतोच. आम्ही विचारामुळे एकत्र होतो असेही पाटील म्हणाले. यावेळी बोलताना व्यासपीठावर बसलेल्या मंत्री संजय सावकारे यांना उद्देशून वस्त्रोद्योग मंत्री असल्याने तुम्ही आम्हाला कपडा द्या आणि मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून तुम्ही आम्हाला पाणी द्या असे पाटील म्हणाले.
असली सरपंच वो होता है जो गाव की तकदीर संभाले
ज्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक एकाच मोटारसायकलवर फिरताना दिसला, समजा ती ग्रामपंचायत पहिली आली, शेवटी चार कामांमध्ये फिफ्टी फिफ्टी होणारच असे पाटील म्हणाले. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांना माझी विनंती आहे, की सरपंच निवडून आलो तरी मी गावाचा आहे आणि पडलो तरी मी गावाचा आहे, अशा ग्रामपंचायतींचा 100 टक्के विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे पाटील म्हणाले. गावातील स्मशानभूमी खराब असली की तिथे गेल्यावर पहिला शब्द लोकांच्या तोडून निघतो, काय कामाचा सरपंच. ज्या गावाचे ग्रामपंचायत कार्यालय सुंदर, त्या गावातील सरपंच आणि गावकऱ्यांचे विचार सुंदर असतात. ज्या गावांमध्ये स्मशान भूमी चांगली त्याठिकाणचे लोक स्वर्गामध्ये जाणार , चांगल्या ठिकाणी जाणार असे पाटील म्हणाले. असली सरपंच वो नही होता जो खुर्ची संभाले, असली सरपंच वो होता है जो गाव की तकदीर संभाले असे पाटील म्हणाले. मी नेहमी विनोदाने म्हणतो की ज्याने पाप केल आहे, तो सरपंच होतो असे पाटील म्हणाले. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत विकास योजना कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी फटकेबाजी केली.
























