(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrashekhar Bawankule : ठाकरेंचं नाणं खोटं आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं अडीच वर्षात बघितलं
Chandrashekhar Bawankule : ठाकरेंचं नाणं खोटं आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं अडीच वर्षात बघितलं
उद्धव ठाकरेंनी बोईसरची सभा झाल्यावर वांद्र्यापर्यंत रेल्वे लोकलमधून प्रवास केला. उद्धव ठाकरेंनी साडेसातच्या सुमाराला बोईसर स्टेशनवरून गाडी पकडली. त्यांनी पहिल्या वर्गातून प्रवास केला. त्यांच्यासह संजय राऊत आणि इतर शिवसेना नेते होते.
महाराष्ट्रात मोदींचं नाणं नाही तर फक्त माझं नाणं चालणार अशी दर्पोक्ती आणि अहंकाराची भाषा आज उद्धव ठाकरेंनी केली. ठाकरेंचं नाणं खोटं आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं अडीच वर्षात बघितलं. महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार असं सांगून तुम्ही काँग्रेसला तर ‘कवडीमोल‘ ठरवून टाकलं. बाळासाहेबांनी मोठ्या कष्टानं शिवसेनेच्या नाण्याला सुवर्ण झळाळी मिळवून दिली, पण तुम्ही सोनिया गांधींची गुलामी स्वीकारून नाण्याची गारगोटी करून घेतली. बाकी आज कधी नाही ते तुम्ही लोकलनं प्रवास केला, यावेळी मुंबईकरांशी चर्चा केली असती तर तुम्हाला.. ‘मोदी की गॅरंटी‘ या नाण्याचा खणखणीत आवाज ऐकू आला असता. देशातील जनतेचा मोदींवर विश्वास आहे. महाराष्ट्रातही ‘मोदी की गॅरंटी‘च चालणार.