Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha
Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha
एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब, रविंद्र चव्हाण भाजपचे नवे राज्य कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडून अधिकृत घोषणा.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चंद्रशेखर बावनकुळेंच्याच अध्यक्षतेखाली होणार , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होणार, तोपर्यंत रवींद्र चव्हाण कार्यकारी अध्यक्षपद सांभाळणार
आज शिर्डीत भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन, मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, अमित शहा, जे.पी नड्डा, अधिवेशनाला उपस्थित राहणार.
भाजपच्या अधिवेशनासाठी आज अमित शाह शिर्डीत येणार, यावेळी शाह साईबाबांचं दर्शन घेणार, दर्शन घेऊन अधिवेशनाला उपस्थित राहणार, तसेच शनिशिंगणापूरलाही दर्शनासाठी जाणार
भाजपच्या अधिवेशनासाठी नेते शिर्डीत, रविंद्र चव्हाण, नारायण राणे, चंद्रकांत पाटील, राम शिंदेंसह इतर नेत्यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन,
शनीशिंगणापूरला दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं साईबाबांचं दर्शन, शिर्डीत आज होत असलेल्या भाजपच्या अधिवेशनासाठी फडणवीस शिर्डीत.