Gold Sliver Rate Drop : सामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्या, चांदीच्या दरात घसरण
Gold Sliver Rate Drop : सामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्या, चांदीच्या दरात घसरण
डॉलरच्या तुलनेत वधारलेलां रुपया त्याच बरोबर रशिया आणि युक्रेन यांच्या मधे काही प्रमाणात निवळलेली युद्ध जन्य परिस्थिती याचा परिणाम म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे..रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरातील गुंतवणूक दारानी सोन्याच्या मधे गुंतवणूक केल्याने सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहोचल्याचे पाहायला मिळाले होते मात्र डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्याच्या पासून रशिया युक्रेन युद्धाची कमी झालेली तीव्रता ,त्याच बरोबर डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया आणि टेरिफ मधील होऊ घातलेले बदल याचा एकत्रित परिणाम म्हणून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे सोने व्यावसायिक सांगत आहे Mगेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची घसरण होऊन 91000 हजार वरून सोन्याचे दर जी एस टी सह 90000 इतके झाले आहे,तर चांदीच्या दरात देखील दोन हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर 101000 वरून 99000 वर खाली आले आहेत..सोन्याच्या आणि चांदीच्या दरात आगामी काळात अजूनही घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने,ग्राहक सोने खरेदी कडे वेट अँड वॉच च्या भूमिकेत असल्याच पाहायला मिळत आहे



















