Tomato Price: एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटला
Tomato Price: उन्हामुळे टोमॅटोचे दर घसरले, उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याचे शेतकऱ्यांची खंत, सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे.

सातारा: राज्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडला आहे. सातारा जिल्ह्य टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. कारण सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक किलो टोमॅटोला दोन रुपयांचा दर मिळत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. हवामान बदलाचा मोठा परिणाम पिकांवर झाला आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठे अवकाळी पावसाचा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे.
टोमॅटोचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
सातारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे, पारा 36 अंश सेल्सीअस पर्यंत पोहचला आहे. याचा मोठा फटका आणि झळ टोमॅटो पिकाला बसत असून, झाडावरच टोमॅटो पिकून गळू लागले आहेत, त्यामुळे टोमॅटोचे दर घसरले असून, यातून उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याचे खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सातारा बाजार समिती मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढली आहे. सातारा बाजार समितीत आज टोमॅटोचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, उन्हामुळे टोमॅटो पीक लवकर खराब होत असल्याने, टोमॅटो दर कमी करून विकण्याची वेळ आली असल्याचे, बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याने सांगितले आहे.
भांडवलं सुध्दा त्यातून निघेना
एका शेतकऱ्याने यावेळी शेतकऱ्याला टोमॅटो रस्त्यावर फेकलं. फुकट झालं. भांडवलं सुध्दा त्यातून निघेना. टोमॅटो रस्त्यावर फेकायची वेळ आली. फुकट, फुकट टोमॅटो फुकट असं देखील तो बाजारात टोमॅटो विकणारा शेतकरी म्हणत आहे. सातारा बाजार समितीत आज टोमॅटोचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, उन्हामुळे टोमॅटो पीक लवकर खराब होत असल्याने, टोमॅटो दर कमी करून विकण्याची वेळ आली असल्याचे, बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याने सांगितले आहे.
राज्यातील अनेक भागात भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. उन्हाळा आला असताना विविध भाज्यांचे दर दोन रूपयांपर्यंत घसरले आहेत. बटाटे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरचीला मोठा भाव नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतातील खत, बियाणे, मजुरी याचा प्रचंड खर्च असूनही बाजारात भाजीपाला अवघ्या 3 ते 12 रुपये किलो दरानं शेतकऱ्याला विकावा लागत आहे. दर घसरल्याने ग्राहकांची चांदी झाली आहे. त्यांना स्वस्तात भाजीपाला खरेदी करता येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
