Sanjay Shirsat on Justice Chandiwal | अनिल देशमुखांना क्लीनचिट देण्याचा प्रश्नच येत नाही
Sanjay Shirsat on Justice Chandiwal | अनिल देशमुखांना क्लीनचिट देण्याचा प्रश्नच येत नाही
मविआ सरकारच्या काळातील 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी नंतरच्या काळात 'तेरी भी चूप, मेरी भी चूप', असे धोरण अंगिकारले होते. या प्रकरणात मी कोणालाही क्लीन चीट दिलेली नाही. साक्षी आणि पुरावे असूनही ते दिले गेले नाहीत. ते पुरावे मिळाले असते तर पुढे काहीतरी घडले असते. माझ्या चौकशीत अनेक अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु होते. ठाण्याचे एक डीसीपी सातत्याने या सगळ्यात हस्तक्षेप करत होते. कोण कोणाला वाचवतंय किंवा अडचणीत आणू इच्छित आहे, हे कळायला मार्ग नव्हता, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती चांदीवार यांनी केले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अनेक बाबी उघड केल्या.