Sanjay Raut : संजय मंडलिक यांचे वडील शाहू महाराजांचे निकटवर्तीय होते - संजय राऊत
Sanjay Raut : संजय मंडलिक यांचे वडील शाहू महाराजांचे निकटवर्तीय होते - संजय राऊत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी महाराष्ट्राच्या जनतेला नितांत आदर आहे छत्रपतींच्या गादीवर ते विराजमान आहेत गादीचा अपमान जर कोणी करत असेल तर महाराष्ट्र ते सहन करणार नाही शाहू महाराजांनी या महाराष्ट्राला सामाजिक दिशा देण्याचा प्रयत्न केला त्या गादीचे ते वारसदार आहेत छत्रपती शाहुंच्या गादीचा मान राखायचा नाही तर काय मोदीच्या गादीचा मान राखायचा का? डुप्लिकेट शिवसेनेने सर्व ताळतंत्र सोडल आहे आता ते छत्रपती शाहू महाराजांपर्यंत पोहोचले त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते बोलत आहेत ते योग्य नाही छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि जे ज्यांनी वक्तव्य केले ते डुप्लिकेट शिवसेनेचे उमेदवार आहेत हा डुप्लिकेट माल आहे त्यांना कोल्हापूरची जनता घरी बसल्याशिवाय राहणार नाही शिवाजी महाराजांची गादी आहे त्या गादी विषयी सर्वांनी सन्मान ठेवला पाहिजे