MVA Seat Sharing : शिवसेना ठाकरे गटाला अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी सकारात्मक
MVA Seat Sharing : शिवसेना ठाकरे गटाला अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी सकारात्मक
गेल्या काही तासांपासून धुवांधार कोसळत असलेल्या पुण्यातील पावसाचा जोर आगामी तासांमध्येही कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. गेल्या काही तासांमध्ये खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरु आहे. परिणामी खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीच्या पात्रात वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास खडकवासला धरणातून साधारण 35,310 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु होता. आज सकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने खडकवासलातून पाणी सोडण्याचा वेग २३ १२२ क्युसेक्सपर्यंत कमी करण्यात आला. मात्र, तरीही भिडे पूलाजवळ पाणी साचायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून भिडे पूलाजवळ जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. येत्या काही तासांत पावसाचा जोर वाढल्यास खडकवासलातून पाणी सोडण्याचा वेग वाढवला जाईल, अशी माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 24 तास पुणे शहर आणि जिल्ह्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. राज्यात पुढील 3-4 दिवस जोरदार पावसाची शक्यता येत्या तीन ते चार दिवसांत राज्यभरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. मराठवाडा वगळता बहुतांश भागात गुरूवारपर्यंत (29 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे.
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/17/4147074c4b7cd62da6d97e16dc3a98de17371370867721000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/17/dcc1c455cc0536de5cb621b9d128ca3317371288424071000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/17/9c11be05b41d8e434835fcca013d68f317371256667201000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/17/101f574b1e233b24beb44abbb6acd0d917371272265331000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/17/c48fa300ed3147f1b0130456643530f417371224508861000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)