एक्स्प्लोर

22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

प्रकाश आंबेडकर यांनी आठवण करून दिली की तबरेज अन्सारी, मोहम्मद अखलाक, पेहलू खान, जुनेद खान, रकबर खान यांसारखे अनेक मुस्लिम मॉब लिंचिंगचे बळी ठरले आहेत

Prakash Ambedkar on PM Modi : ईदनिमित्त 32 लाख मुस्लिमांना 'सौगत-ए-मोदी' किटचे वाटप करण्याच्या मोदी सरकारने केलेल्या घोषणेवरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. या किटमध्ये शेवया, चंद्र खजूर, सलवार-कमीज आणि कुर्ता-पायजमा यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. ही ‘सणाची भेट’ म्हणून सादर केली जात आहे, मात्र वंचित बहुजन आघाडीचे (व्हीबीए) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले की, "लहू में भीगी हुई सौगात-ए-मोदी! सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली." ते पुढे म्हणाले की, ज्यांचे हात मुस्लिमांच्या रक्ताने माखले आहेत तेच आता त्यांना मिठाई आणि कपडे देऊन शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

देशातून 22 टक्के हिंदू बाहेर जाऊ पाहत आहे

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इतर पक्ष वाटप करतात आणि भाजप आरएएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. 1999 पासून सत्तेत आल्यापासून ॲंटी मुस्लिम भूमिकेचा स्टॅंड राहिलेला आहे. गोध्रा घडवण्यात आलेलं आहे. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर अखलाक, शाबीर यांचे माॅब लिंचिंग केलं जातं आणि त्याचे व्हीडिओ आपल्याला मिळतात. मुस्लिमांना साईड ट्रॅक करायचं हा भाजप आणि आरएसएसचा प्रयत्न आहे. मात्र, सौगात ए मोदी कार्यक्रम येतो तेव्हा शंका येते. अशात हे राजकीयदृष्टीनं केलेला हा कार्यक्रम आहे. देशातून 22 टक्के हिंदू बाहेर जाऊ पाहत आहे, अशात मतदार जात असल्याने हे कृत्य करत आहे. मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन चाललेलं आहे. ही प्रेमाची नव्हे तर राजकीय भेट आहे

बिल्किस बानोवर झालेला अत्याचार विसरणेही अवघड 

त्यांनी आठवण करून दिली की तबरेज अन्सारी, मोहम्मद अखलाक, पेहलू खान, जुनेद खान, रकबर खान यांसारखे अनेक मुस्लिम मॉब लिंचिंगचे बळी ठरले आहेत आणि आजपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. 2002 च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानोवर झालेला अत्याचार विसरणेही अवघड आहे. आंबेडकरांनी विचारले की, "मुस्लिम इतक्या लवकर विसरतील का ज्यांनी त्यांच्याविरुद्ध द्वेष पसरवला, त्यांच्या धार्मिक चिन्हांचा अपमान केला आणि आता तेच लोक त्यांना निवडणुकीपूर्वी ईद भेट देत आहेत?"

मौलवी गप्प का आहेत?

वक्फ मालमत्तेबाबत नुकतेच आलेले दुरुस्ती विधेयक आणि देशभरात बुलडोझरच्या कारवाईद्वारे मुस्लिमांची ओळख पुसून टाकण्याच्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. निवडणुकीच्या वेळी मुस्लिमांना दिशा दाखवणाऱ्या, पण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौन बाळगणाऱ्या मौलवींवर प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, मुस्लिमांच्या प्रत्येक दुखात साथ देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे आणि आता पवित्र धाग्याच्या नेत्यांसाठी मते मागणारे मौलवी गप्प का आहेत? शेवटी आंबेडकरांनी मुस्लिमांना आवाहन केले की, "जागे व्हा आणि समजून घ्या की मिठाई आणि कपडे तुमच्या मतांचा आणि सन्मानाचा पर्याय असू शकत नाहीत. तुमचा खरा मित्र कोण आणि तुमचा शत्रू कोण आहे हे जाणून घ्या." ही भेट नाही, राजकीय रणनीती आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report
Indigo Flight : इंडिगो कधी सावरणार? प्रवास सुरळीत कधी होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget