![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Unlock: 22 ऑक्टोबरपासून थिएटर सुरु होणार; ही सर्वात मोठी आनंदाची बातमी : अशोक सराफ
Maharashtra Unlock: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्य सरकारने काल शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
गेले अनेक दिवस सिने-नाट्यगृहे कधी सुरु होणार अशी चर्चा सिने-नाट्यवर्तुळात होत होती. सिनेमाप्रेमीदेखील कधी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहता येईल याची वाट बघत होते. तर नाट्यप्रेमी त्यांच्या लाडक्या तिसऱ्या घंटेचा आवाज कानात कधी घुमणार याची प्रतिक्षा करत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर थिएटर मालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळुन खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्यपध्दती एसओपी तयार करणयाचे काम सुरु असून ती लवकरच जाहीर करणयात येईल. आज टास्कफोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत चर्चा केली.
याआधीही कोरोना व्हायरसच्या साथीमुळेच सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क अनिवार्य होते. निर्जंतुकीकरण आणि कोविड नियमावलीचे पालन करण्यासदेखील सांगितले होते. यंदा देखील अशाच पध्दतीची नियमावली सरकार जाहीरकरू शकते. कलाकार, पडद्यामागचे कलाकार, रंगकर्मी, प्रेक्षक अशा सर्वांनाच या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
![ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 27 December 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/27/fb3392bfe6e9a196b62d9dda0821e46017352640844071000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Majha Gaon Majha Jilha at 630AM 27 December 2024 माझा गाव, माझा जिल्हा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/27/82453c557bbcab9a00ea9659123c2b5717352636831601000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 27 December 2024 एबीपी माझा लाईव्ह](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/27/cc36c6e7742cb6a5d244fe3a80c788c717352632775251000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 27 December 2024 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/27/a0db9aa40eac07dc8d8a2d5dbcd3d0f517352629780261000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Eknath Shinde Vacation Mode Special Report : आधी दरेगावात शेती, आता काश्मीरमध्ये विश्रांती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/27/23ac35c29c46e4faa36c030a942c07ac17352627985371000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)